२०१० मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor ) आता ब्लॉकबस्टर चित्रपट देत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून श्रद्धा कपूर आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत आहे. अभिनेते शक्ति कपूर आणि शिवांगी कोल्हापुरी यांची ही लाडकी लेक बॉलीवूडची आघाडी अभिनेत्री झाली आहे. ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. ८०० कोटींहून अधिक पैसे कमावणाऱ्या ‘स्त्री २’ चित्रपटाच्या यशाचा आनंद श्रद्धा कपूर घेत आहे. अशातच तिने जुहूमध्ये आलिशान महागडं अपार्टमेंट भाड्याने घेतल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री श्रद्धा कपूरने ( Shraddha Kapoor ) जुहूमध्ये स्वतःसाठी आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे. ज्याचं भाडं एक किंवा दोन लाख नाही तर सहा लाख प्रतिमाह आहे. Zapkeyने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ३९२८.८६ स्क्वेअर फूट श्रद्धाचं अपार्टमेंट आहे. एका वर्षांसाठी तिने हे अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे. या अपार्टमेंटसाठी श्रद्धाने अ‍ॅडव्हान्स ७२ लाख रुपये दिल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – स्वप्नील जोशी आता डॅशिंग अंदाजात झळकणार, म्हणाला, “माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा…”

श्रद्धाने स्टॅम्प ड्यूटीसाठी मोजले ‘इतके’ हजार

जुहूमधील या अपार्टमेंटसाठी १६ ऑक्टोबरला अभिनेत्रीने करार केला. ज्यामध्ये चार गाड्यांचा पार्किंग एरिआ सामील आहे. याशिवाय श्रद्धाने ३६ हजार स्टॅम्प ड्यूटी आणि १००० रुपये रजिस्ट्रेशन फी दिली आहे. पण याबाबत अद्याप श्रद्धा कपूरने ( Shraddha Kapoor ) स्वतः काहीही सांगितलं नाहीये.

हेही वाचा – “जितकं आपण या अभिनेत्रीला…”, चिन्मय मांडलेकरने निवेदिता सराफांचं भरभरून कौतुक करत केली खंत व्यक्त, म्हणाला…

२०१५मध्ये श्रद्धा कपूरचं ( Shraddha Kapoor ) नाव ‘फोर्ब्स इंडिया सेलिब्रेटी १००’च्या यादीत सामीर होतं. या यादीत अभिनेत्रीचं नाव ५७व्या स्थानावर होतं. याशिवाय श्रद्धा कपूरचं नाव ‘फोर्ब्स ३० अंडर ३० एशिया’ यादीत सामील झालं आहे.

हेही वाचा – Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, श्रद्धा कपूरच्या ( Shraddha Kapoor ) आधी दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने मुंबईतील पाली हिल भागात तीन वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने घेतला होता. या फ्लॅटचं भाडं प्रतिमाह आठ लाख रुपये होतं. तसंच बॉलीवूड अभिनेता इमरान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लेखा वाशिंग्टन यांनी करण जोहरकडून भाड्याने फ्लॅट घेतला होता. वांद्रे येथील भागात तीन वर्षांसाठी त्यांनी ९ लाख रुपये प्रतिमाह मोजले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress shraddha kapoor rents luxurious rs 6 lakh per month juhu apartment pps