Sonakshi Sinha Wedding: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीनं लग्न करत दोघांनी आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. कुटुंबियांच्या आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोनाक्षी व इक्बालचं लग्न झालं आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच लग्नातील सोनाक्षीच्या जबरदस्त एन्ट्रीचा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा व पूनम सिन्हा यांची लाडकी लेक म्हणजेच सोनाक्षीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मुंबईतील ‘रामायणा’ बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष सोनाक्षीच्या लग्नाकडे होतं. झहीर इक्बाल हा मुस्लिम असल्यामुळे ती कोणत्या पद्धतीनं लग्न करणार याची चर्चा सुरू होती. अखेर आज दोघांनी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं आहे. लग्नात सोनाक्षीची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळाली. याचा व्हिडीओ अभिनेता प्रियांक शर्मानं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

हेही वाचा – सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालनं नोंदणी पद्धतीनं केलं लग्न, अभिनेत्री खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाली, “सात वर्षांपूर्वी…”

या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा राहत फतेह अली खान यांचं लोकप्रिय गाणं ‘आफरीन’वर एन्ट्री करताना दिसत आहे. लग्नात सोनक्षीनं खास तिच्या आईची साडी आणि दागिने परिधान केले होते. तिनं ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी नेसली होती; ज्यावर मॅचिंग चोकर, कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या. तसंच केसात गजरा माळला होता. तर झहीरनं सोनाक्षीला मॅचिंग करण्यासाठी व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती.

हेही वाचा – किरण मानेंच्या पत्नीला पाहिलंत का? खास पोस्ट लिहित म्हणाले, “माझा हात हातात घेऊन…

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Sonakshi-Wedding-28.mp4

हेही वाचा – विजय मल्ल्याच्या लेकानं ख्रिश्चन पद्धतीनं गर्लफ्रेंडशी केलं लग्न, पहिला फोटो आला समोर

दरम्यान, सोनाक्षीनं सर्वात आधी लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करत तिनं लिहिलं, “आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी (२३.०६.२०१७) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते प्रेम टिकवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमानं आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये मार्गदर्शन केलं आहे. तसंच या क्षणापर्यंत नेलं आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवांच्या आशीर्वादानं आता आम्ही नवरा आणि बायको झालो आहोत…सोनाक्षी आणि झहीर…२३.०६.२०२४”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress sonakshi sinha grand entry in wedding video viral pps