Sonam Kapoor Breaks Down In Tears: ‘सावरिया’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. ‘सावरिया’ चित्रपटानंतर सोनम ‘दिल्ली ६’, ‘आयशा’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘थँक यू’, ‘प्लेयर्स’, ‘रांझणा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘निर्जा’, ‘संजू’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली. तिला पहिल्याच ‘सावरिया’ चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले होते. सोनमचा अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहे, तितकाच तिच्या सौंदर्याचा, फॅशन सेन्सचा चाहता वर्ग आहे. सध्या सोनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप होत आहे. ज्यामध्ये ती अचानक रॅम्प वॉक करताना ढसाढसा रडताना दिसत आहे. यावेळी नेमकं काय झालं? जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच गुरुग्राम येथे आयोजित केलेल्या ‘ब्लेंडर्स प्राइड एक्स एफडीसीआय फॅशन टूर २०२५’मध्ये सामील झाली होती. यावेळी तिने जबरदस्त रॅम्प वॉक केला. पण अचानक तिला अश्रू अनावर झाले. यामागचं कारण होतं दिवंगत प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल उर्फ गुड्डा.

सोनम कपूरने ‘ब्लेंडर्स प्राइड एक्स एफडीसीआय फॅशन टूर २०२५’ या कार्यक्रमात रोहित बाल यांच्यासाठी रॅम्प वॉक केला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रोहित बाल यांचं निधन झालं होतं. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेर श्वास घेतला. त्यांच्या स्मरणार्थ सोनमने रॅम्प वॉक केला आणि हात जोडून त्यांना नमस्कार केला. याच वेळी सोनम रोहित बाल यांच्या आठवणीत रडू लागली.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सोनम कपूर म्हणाली की, मी गुड्डा यांच्यासाठी इथे आली होती, ज्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला बऱ्याचदा त्यांनी डिझाइन केलेले कपडे घालायला मिळाले, हे माझं भाग्य आहे.

सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर रोहित बाल यांनी डिझाइन केलेल्या आउफिटमध्ये सुंदर फोटो शेअर केले आहेत. ऑफ व्हाइट गाउनबरोबर सुंदर नक्षी असलेलं जॅकेट सोनमने घातलेलं पाहायला मिळत आहे. या आउफिटवर तिने केसात बरेच गुलाब माळले आहेत. हे फोटो शेअर करत सोनमने लिहिलं की, रोहित बाल यांना श्रद्धांजली देण्यासाठी रॅम्प वॉक करणं हा सन्मान आहे. त्यांची सर्जनशीलता, दृष्टी आणि वारसा यांनी भारतीय फॅशनला आकार दिला आहे. त्यांच्या स्मरणार्थ रॅम्प वॉक करणं भावनिक आणि प्रेरणादायी होतं. ते एक आयकॉन होते आणि नेहमी असतील.

दरम्यान, सोनम कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘ब्लाइंड’ चित्रपटात झळकली होती. ७ जुलै २०२३ला प्रदर्शित झालेल्या या क्राइम थ्रिलर चित्रपटात सोनमसह पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनुसार, सोनमने दोन नवीन प्रोजेक्ट्स साइन केले आहेत. ज्याबद्दल लवकरच जाहीर केलं जाणार आहे.