Sonnalli Seygall Welcomes Baby Girl: ‘प्यार का पंचनामा’ फेम लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री सोनाली सेहगल आई झाली आहे. सोनालीने जून २०२३ मध्ये बिझनेसमन आशिष सजनानीशी लग्न केलं होतं. आता हे दोघेही आई-बाबा झाले आहेत. बाळाच्या जन्मामुळे आनंदी असलेल्या आशिषने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

३५ वर्षीय सोनाली सेहगल आई झाली आहे. तिने मुलीला जन्म दिला आहे. सोनाली व आशिष लग्नानंतर दीड वर्षांनी गोंडस लेकीचे आई-बाबा झाले आहेत. दोघेही आपल्या लेकीच्या जन्मानंतर खूप आनंदी आहेत. आशीषने रुग्णालयात नाचतानाचा व्हिडीओ शेअर केला व बाळाच्या जन्माची बातमी चाहत्यांशी शेअर केली. या व्हिडीओत त्यांच्या बाळाचा रडण्याचा आवाज येतोय.

हेही वाचा – लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्याने दिली गुड न्यूज; लग्नाच्या १० वर्षानंतर केलं दुसऱ्या बाळाचं स्वागत

आशीषने शेअर केलेला व्हिडीओ-

आशीष सजनानीचा व्हिडीओ (सौजन्य – इन्स्टाग्राम)

सोनाली सेहगल व बिझनेसमन आशिष सजनानी यांनी ७ जून २०२३ रोजी लग्न केलं. या जोडप्याने पाच वर्षे एकमेकांना गुपचूप डेट केलं आणि दीड वर्षापूर्वी मुंबईत लग्नगाठ बांधली. त्यानंतर सोनालीने १६ ऑगस्टला इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ती व आशिष आई-बाबा होणार आहेत, ही बातमी दिली होती.

हेही वाचा – माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी

सोनालीच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘प्यार का पंचनामा’, ‘जय मम्मी दी’, ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटू की स्विटी’, ‘सेटर्स’, ‘हायजॅक’, ‘वेडिंग पुलाव’, ‘बुंदी रायता’, ‘नुरानी चेहरा’, ‘जाने कहां से आई है’ या सिनेमांसाठी ओळखली जाते.

Story img Loader