अभिनेत्री सुश्मिता सेनची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ताली’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. या वेबसीरिजद्वारे तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा संघर्ष उलगडण्यात आला आहे. यात गौरी सावंत यांची भूमिका अभिनेत्री सुश्मिता सेनने साकारली आहे. नुकतंच सुश्मिताने तिच्या पहिल्या पगाराबद्दल खुलासा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुश्मिता सेनने विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘दस्तक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सुश्मिता अनेक सुपरहिट चित्रपटात झळकली. सध्या सुश्मिताच्या ताली या वेबसीरिजबद्दल प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने तिने एका चॅनलला मुलाखत दिली.
आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…” 

या मुलाखतीत सुश्मिताला तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी सुश्मिताला “तुला पहिला पगार किती रुपये मिळाला होता?” असे विचारण्यात आले. त्यावर तिने अजिबात वेळ न घालवता उत्तर दिले. यावेळी सुश्मिताने “२५०० रुपये” असं म्हटलं.

आणखी वाचा : Video : “ही कायम सोबत ठेव…”, ‘ताली’मधील सुश्मिता सेनच्या गळ्यातील ‘त्या’ रुद्राक्षाच्या माळेची खासियत, रवी जाधव यांचा खुलासा

सुश्मिताचे हे उत्तर ऐकून अनेकजण चकित झाले. दरम्यान सुश्मिताने तब्बल दहा वर्षांनी सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण केले. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटात शेवटची झळकली होती. त्यानंतर २०२० मध्ये आर्या या वेबसीरिजद्वारे तिने पुनपदार्पण केले. सध्या तिची प्रमुख भूमिका असलेली ‘ताली’ ही वेबसीरिज प्रचंड गाजताना दिसत आहे.