बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन नेहमी चर्चेत असते. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. अलीकडेच एका अवॉर्ड शोदरम्यान सुश्मिता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल एकत्र दिसले होते. यानंतर आता सुश्मिता सेनने रोहमन शॉलबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर चाहत्यांमध्ये रोहमन आणि सुश्मिताच्या पॅच-अपच्या बातम्यांनी जोर धरला आहे.
हेही वाचा- लग्नाच्या चर्चांदरम्यान सनी देओलचा मुलगा करण प्रेयसी द्रिशाबरोबर डिनर डेटवर; फोटो व्हायरल
गुरुवारी सुश्मिता सेनने तिच्या अधिकृत इ्न्स्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीत सुश्मिता सेनबरोबर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल दिसत आहे. सुष्मिता सेनने या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनची सगळीकडे चर्चा सुरु आहे. सुष्मिता सेनने फोटो शेअर करत छान फोटो रोहमन असं लिहिलं आहे. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काही महिन्यांपूर्वी सुश्मिता सेन आणि रोहमनच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. यानंतर सुश्मिता सेन आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदीच्या डेटिंगच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला होता. पण आता पुन्हा एकदा सुश्मिता आणि रोहमन शॉल यांच्यातील जवळीक वाढू लागली आहे.
हेही वाचा- चित्रपटांमधील भूमिकेबाबत नवाजुद्दिन सिद्दिकीची मोठी घोषणा; म्हणाला, “आता फक्त…”
सुष्मिता सेनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आगामी काळात ती ‘आर्य ३’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सध्या सुष्मिता सेन ‘आर्य ३’मुळे खूप चर्चेत आहे. या वेबसीरिजच्या मागील दोन सीझनमध्ये तिने आपल्या अभिनयातून सर्वांची मने जिंकली होती. लवकरच सुष्मिता सेनचा ‘आर्य ३’ OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.