अभिनेत्री सुश्मिता सेनची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ताली’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. या वेबसीरिजद्वारे तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा संघर्ष उलगडण्यात आला आहे. यात गौरी सावंत यांची भूमिका अभिनेत्री सुश्मिता सेनने साकारली आहे. नुकतंच सुश्मिताने तिचं पार्टी करण्याबद्दल काय मत आहे, याबद्दल खुलासा केला.

सुश्मिता सेनने विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘दस्तक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सुश्मिता अनेक सुपरहिट चित्रपटात झळकली. सुश्मिताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले.
आणखी वाचा : “मला नवरा हवाय, पण माझ्या दोन्हीही मुलींना…”, वयाची ४५ शी ओलांडलेल्या सुश्मिता सेनने केला लग्नाबद्दल खुलासा, म्हणाली “माझे वडील…”

या मुलाखतीत सुश्मिताला “पार्टी करणं आवडतं की शांततेत रात्र घालवणं”, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “माझ्याबरोबर कोण आहे, त्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. सुश्मिताचे हे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे.

आणखी वाचा : “तुझा पहिला पगार किती रुपये होता?” सुश्मिता सेन म्हणाली…

दरम्यान सुश्मिता सेन ही २०२० मध्ये ‘आर्या’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. त्यानंतर आता तिची प्रमुख भूमिका असलेली ‘ताली’ ही वेबसीरिज प्रचंड गाजताना दिसत आहे. यात तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा संघर्ष उलगडण्यात आला आहे.