Lok Sabha Elections Results 2024: गेल्या काही दिवसांपासून देशभरात लोकसभा २०२४च्या निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान झाले. आज मतमोजणी सुरू असून वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपाप्रणित एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडीमध्ये चुरस दिसत आहे. भाजपाने केलेले दावे फोल ठरत आहेत. त्यामुळे सध्या विरोधी पक्षातील नेतेमंडळी भाजपाला टोला लगावत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील सोशल मीडियाद्वारे भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे.

भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पार जागा जिंकणार असल्याच्या घोषणा केल्या होत्या. तसंच काही जणांनी भाजपा ३०० हून अधिक जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. पण संपूर्ण चित्र पालटलं आहे. भाजपाप्रणित एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये चुरस सुरू आहे. सध्या एनडीए २९३ जागांनी आघाडीवर असून इंडिया आघाडी २३२ जागा जिंकल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजपाला विजयासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवरून स्वरा भास्करने ‘एक्स’वर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – “अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब…”, अयोध्येतील निकालाबद्दल गायक सोनू निगमची पोस्ट; म्हणाला, “५०० वर्षांनंतर राम मंदिर…”

अभिनेत्री स्वराने भाजपाला टोला लगावत लिहिलं आहे, “ते म्हणतात ना, टायटॅनिक बुडण्यासारखे नव्हते पण मग एक दिवस आला आणि ते बुडाले. सरकार कोणाचंही स्थापन झालं तरी आज भारताने द्वेष, भ्रष्टाचार, लोभ आणि अहंकाराचा पराभव केला आहे.”

तसंच तिनं आणखी एक पोस्ट केली आहे. उत्तर प्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघातील निकालावरून स्वराने ही पोस्ट केली आहे. अयोध्या शहर हे फैजाबाद मतदारसंघात मोडते. त्यामुळे तिनं लिहिलं आहे, “श्रीरामाचं नाव बदनाम करणाऱ्यांना, त्यांच्या नावावरून पाप करणाऱ्यांना जय श्रीराम.”

हेही वाचा – “माझी प्रिय कंगना…”, बॉलीवूडची ‘क्वीन’ मंडीतून विजयी झाल्यावर अनुपम खेर यांची खास पोस्ट, म्हणाले…

दरम्यान, भाजपाला जिथे जिंकण्याची अधिक अपेक्षा होती त्याचं उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे ३७ आमदार आघाडीवर आहेत. तर भाजपा ३३ ठिकाणी आघाडीवर आहे.