बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर विवाहबंधनात अडकली आहे. स्वराने सामाजिक कार्यकर्ता फहाद अहमदशी लग्नगाठ बांधली. ६ जानेवारीला स्वरा व फहादने कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केलं. स्वराने ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत लग्नाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
स्वराने फहाद अहमदबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वराने पहिल्या भेटीपासून ते लग्न करण्यापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा केला आहे. “आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा आपण काही वेळेस खूप शोध घेतो. प्रेमाच्या शोधात असणाऱ्या आम्ही दोघांनाही पहिल्यांदा मैत्री सापडली. त्यानंतर आम्ही एकमेकांना खऱ्या अर्थाने भेटलो”, असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलं आहे. स्वराने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिच्या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी स्वरा व फहाद अहमदला शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वराने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी स्वरा भास्कर एक आहे. स्वरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. स्वरा समाजातील अनेक घडामोडींवर व्यक्त होताना दिसते.
कोण आहे फहाद अहमद?
फहाद अहमद एक सामाजिक कार्यकर्ता असून राजकारणात सक्रिय आहे. समाजवादी पार्टीमध्ये तो कार्यरत आहे. महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीशी त्याचं खास कनेक्शन आहे. CAA विरोधी आंदोलनातही तो सहभागी झाला होता.