बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा युवानेता फहाद अहमदशी लग्नगाठ बांधली आहे. ६ जानेवारीला स्वरा व फहादने कोर्ट मॅरेज केलं आहे.ट्वीटरवरुन लग्नाचा व्हिडीओ शेअर करत स्वराने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यानंतर आता स्वरा व अहमदने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

स्वराने लग्नाची बातमी दिल्यानंतर आता तिच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ‘फिल्मवाला’ या इन्स्टाग्राम पेजवरुन स्वराच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. साखरपुड्यासाठी स्वराने लाल रंगाची साडी व डिझायनर ब्लाऊज असा साधा लूक केला होता. तर फहादने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा व त्यावर लाल रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. स्वरा भास्कर व फहादला चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
AI generated image of PM Narendra Modi Goes Viral
PM Narendra Modi: कामगाराने गुपचूप काढला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो? पण व्हायरल दावा खरा की खोटा? वाचा सत्य बाजू…
viraj bahl Success Story
Success Story: “याला म्हणतात जिद्द…” कंपनी विकली, घर विकलं.. अन् मेहनतीच्या जोरावर उभा केला करोडोंचा व्यवसाय
Nagpur, suicide , police station,
नागपूर : खळबळजनक! पोलीस ठाण्यात आरोपीने चाकू स्वत:च्या पोटात…
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?
Richa Chadha
मुलाला योग्यप्रकारे वाढविण्याची जबाबदारी स्त्रियांची का असते? रिचा चड्ढा गिझेल पेलिकॉटचे उदाहरण देत म्हणाली…
Marathi Actress Rucha Vaidya Engagement
अडीच महिन्यांपूर्वी आदिनाथ कोठारेच्या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या मराठी अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, फोटो आले समोर

हेही वाचा>> स्वरा भास्करने दिलेलं पतीच्याच लग्नात येण्याचं वचन; फहाद अहमदबरोबर ‘अशी’ झाली होती पहिली भेट

स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. प्रेमाच्या शोधात असलेल्या स्वरा व फहादला एकमेकांमध्ये चांगले मित्र भेटले. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फहादशी कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वराने नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

हेही वाचा>> समाजवादी पार्टीचा नेता ते CAA विरोधात आंदोलन; जाणून घ्या स्वरा भास्करचा पती फहाद अहमदबद्दल

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या स्वराने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. स्वराचा पती फहाद एक सामाजिक कार्यकर्ता आहे. फहाद सीएएविरोधी आंदोलनात सहभागी झाला होता. समाजवादी पार्टीचा तो युवा नेता आहे.

Story img Loader