तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी ही वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. तापसी पन्नू ही सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. तिच्या अभिनयाची लोक प्रशंसा करतात, पण तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिला बरंच ट्रोलही केलं जातं. आता लवकरच ती किंग अर्थात शाहरुख खानबरोबर रोमान्स करताना दिसून येणार आहे.
इंडिया टुडेशी बोलताना तिने सांगितले की “हा राजू सरांचा चित्रपट आहे. त्यांचं जग मला प्रिय आहे. त्या सेटवर कोणी मजा करत नसेल तर मला खूप आश्चर्य वाटेल.” शाहरुख बरोबर रोमान्स करताना दिसणार का या प्रश्नावर ती म्हणाली, राजकुमार हिरानीच्या चित्रपटात, जर तुम्हाला शाहरुख खानबरोबर रोमान्स करायला मिळाला, तर मी उत्तमरीत्या करेन, आणखीन काय हवंय?” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तापसी पन्नू शाहरुख खानसोबत पहिल्यांदाच राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती आणि ती २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच शाहरुख जवान आणि ‘पठाण’ अशा दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
तापसीचा ‘ब्लर’ हा चित्रपट झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून तापसी प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तापसी पन्नू मध्यंतरी ‘दोबारा’ या चित्रपटात झळकली. याचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता