संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटात रणबीरबरोबर इंटीमेट सीन देणारी तृप्ती सर्वाधिक लक्षवेधी ठरली आणि नॅशनल क्रश झाली. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे तिला भाभी २ असं नाव पडलं. त्यानंतर तृप्तीला बऱ्याच चित्रपटाच्या ऑफर आल्या. ‘अ‍ॅनिमल’नंतर तृप्ती डिमरी विकी कौशलसह ‘बॅड न्यूज’ चित्रपटात रोमान्स करताना दिसली. आता पुन्हा एकदा बॉलीवूडच्या चॉकलेट बॉयबरोबर तृप्ती रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरी बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर करण्यासाठी तयार झाली आहे. ही नवी जोडी विशाल भारद्वाजचा अ‍ॅक्शन चित्रपट ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार आहे. तृप्तीने हा चित्रपट साइन केला आहे. माहितीनुसार, ‘अर्जुन उस्तरा’ चित्रपटाचं प्री-प्रोडक्शन सुरू झालं आहे आणि ६ जानेवारी २०२५मध्ये हा चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटासाठी मोठा स्टुडिओ उभा केला जाणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…

शाहीद कपूर आणि तृप्ती डिमरीचा हा चित्रपट स्वातंत्र्य काळानंतरच्या अंडरवर्ल्डवर आधारित असणार आहे. या चित्रपटाच चित्रीकरण लवकर पूर्ण करून २०२५मध्ये ‘अर्जुन उस्तरा’ प्रदर्शित करण्याचा हेतू निर्मात्यांचा आहे. पण अद्याप याबाबत अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही.

हेही वाचा – १० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तृप्ती डिमरी कथित बॉयफ्रेंडबरोबर मुंबईत बाईक राइड करताना दिसली. उद्योगपती सॅम मर्चेंटला तृप्ती डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. सॅम हा एक उद्योगपती असून गोव्यातील एका रेस्टॉरंटचा तो मालक आहे. याआधी तृप्तीने अनुष्का शर्माचा भाऊ कर्नेश शर्माला डेट केलं होतं.

हेही वाचा – Video: “जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज…”, अस्वच्छेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला; म्हणाला, “आता खपवून घेणार नाही…”

जेव्हा तिने कर्नेशच्या निर्मितीत तयार झालेल्या ‘बुलबुल’ चित्रपटात काम केलं. तेव्हापासून दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ‘बुलबुल’ या चित्रपटानंतर तृप्तीने कर्नेशच्या ‘कला’मध्ये देखील काम केलं. त्यानंतर सातत्याने दोघं अनेक पार्टीजमध्ये दिसले. एवढंच नाही तर दोघांचे रोमँटिक फोटो देखील व्हायरल झाले होते. पण दोघांनी कधी रिलेशनशिपबाबत सांगितलं नाही. गेल्या वर्षी तृप्ती आणि अनुष्काच्या भावाचा ब्रेकअप झाला.

Story img Loader