काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं. त्यामुळे सध्या सत्ताधारी व विरोधकांच्या प्रचाराचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये चुरशीची होणार आहे. अशातच एका बॉलीवूडच्या बोल्ड व हॉट अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्रीने स्वतः एक मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकारणात प्रवेश करू इच्छिणारी बॉलीवूडची बोल्ड व हॉट प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला. ‘हेट स्टोरी ४’, ‘ग्रेट गँड मस्ती’, ‘सनम रे’ आणि ‘वर्जिन भानुप्रिया’ यांसारख्या चित्रपटात काम करून आता उर्वशीला इंडस्ट्रीत ११ वर्ष पूर्ण झालं आहे. अभिनय, सौंदर्याच्या जोरावर उर्वशीनं बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता अभिनेत्री राजकारणात पाऊल ठेवण्यासाठीही तयार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – Video: गरीब मुलांना बॉबी देओलने दिले ५०० रुपये; मुलांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून अभिनेता लागला हसू

‘इंस्टंट बॉलीवूड’शी संवाद साधताना उर्वशीला विचारलं की, तुला राजकारणात किती रस आहे? तू राजकारणातल्या घडामोडींना फॉलो करते का? यावर अभिनेत्री म्हणाली, “मला आधीच तिकिट मिळालं आहे. त्यामुळे मला आता निर्णय घ्यायचा आहे की, राजकारणात भाग घेऊ की नका? मी अजूनपर्यंत काही ठरवलं नाहीये. त्यामुळे मला चाहत्यांनी सांगा, राजकारण प्रवेश करू की नको?”

उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हिच्यापेक्षा मला राखी सावंत चांगली वाटू लागली आहे.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तिकिट मिळालं आहे, पण ती दिल्ली कॅपिटल्स सामन्याचं…” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “नको. तू जिथे आहेस तिथेच राहा.”

हेही वाचा – ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम अभिनेता लवकरच अडकणार लग्नबंधनात; मराठी कलाकारांनी केलं केळवण

दरम्यान, उर्वशी लवकरच विनय शर्मा दिग्दर्शत ‘जेएनयू’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात उर्वशीसह सिद्धार्थ बोडके, पीयूष मिश्रा, विजय राज आणि अतुल पांडे हे महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. ५ एप्रिलला ‘जेएनयू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress urvashi rautel join politics she said i got ticket pps