बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रपटात फारशा महत्त्वाच्या भूमिका करत नसली तरी उर्वशी तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते. मध्यंतरी तीचं नाव क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्याशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर अजूनही उर्वशीच्या कोणत्याही सोशल मीडिया पोस्टचा संबंध ऋषभ पंतशी लावत असतात. नुकताच तिने एक ‘आय लव्ह यू’ म्हणतानाचं रील पोस्ट केलं जे खूप व्हायरल झालं, त्याचाही संबंध नेटकऱ्यांनी ऋषभशी लावला होता.

आता पुन्हा अशाच एका व्हिडिओमुळे उर्वशी चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी चित्रविचित्र पद्धतीने नाचताना दिसत आहे. याबरोबरच या पोस्टमध्ये तिने तिच्या चाहत्यांना एक सवाल केला आहे. उर्वशीने विचारलं की “यंदाची दिवाळी मी भारतात साजरी करू की ऑस्ट्रेलियामध्ये?” तिच्या या प्रश्नावर कॉमेंट करत बऱ्याच चाहत्यांनी उत्तरं दिली आहेत.

एका यूझरने कॉमेंट केली की “पहिले ऋषभची मनधरणी कर आणि मग दिवाळी साजरी कर.” असं म्हणत बऱ्याच नेटकऱ्यांनी तिला प्रेमाचे धडे दिले आहेत. काहींनी तर ही प्रेमात वेडी झाली आहे अशी कॉमेंटदेखील केली आहे. तिच्या या व्हिडिओवर काहींनी ऋषभ पंतलाही टॅग करत तिला होकार दे अशी विनंती केली आहे.

आणखी वाचा : “भारतीय प्रेक्षक खूप…” अभिनेता, दिग्दर्शक रिषभ शेट्टीने उलगडलं ‘कांतारा’च्या यशामागील रहस्य

सोशल मीडियावर व्हिडिओमुळे ट्रोल होणं हे उर्वशीसाठी नवीन नाही. ऋषभ पंतशी तीचं नाव जोडलं गेल्याने सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल बरंच गॉसिप सुरू असतं. शिवाय या सगळ्या गोष्टींना उर्वशीही जास्त मनावर घेत नाही.

Story img Loader