बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या चर्चेत आहे. ‘कान्स’ चित्रपट महोत्सवातील उर्वशीच्या लूकची चांगलीच चर्चा झाली होती. उर्वशी रौतेलाच्या हटके लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ‘कान्स’ फेस्टिव्हलसाठी उर्वशीने गुलाबी रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. याबरोबरच उर्वशीने गळ्यात मगरीचे डिझाइन असलेला नेकलेसही घातला होता. उर्वशीच्या या नेकलेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या हटके लूकवरून उर्वशीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. मात्र, या नेकलेसची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का?
उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘कान्स’ फेस्टिव्हलमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्वशीला लूकवरून ट्रोल केलं होतं. “गळ्यातील पाल जिवंत झाली तर फोटोशूट सोडून पळून जाशील,” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “ऋषभ पंतने रात्री ३ वाजता व्हिडीओ कॉलवर साप बघितला, म्हणून त्याचा अपघात झाला असावा,” अशी कमेंट केली होती.
गळ्यातील नेकलेसवरून उर्वशीला ट्रोल करण्यात येत असलं तरी या नेकलेसची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. रिपोर्ट्सनुसार, या नेकलेसची किंमत सुमारे २०० कोटी रुपये आहे. हा नेकलेस फ्रेंच लक्झरी फर्म कार्टियरने बनवला आहे. आणि कंपनीने या नेकलेसवर सुमारे २० दशलक्ष युरो म्हणजेच १७९ कोटी रुपये खर्च केले आहेत.
मूळ नेकलेस हा कार्टियर ब्रॅण्डच्या उत्कृष्ट कलेक्शनमधील प्राचीन दागिन्यांचा एक भाग आहे. हा नेकलेस पहिल्यांदा २०१८ साली मध्ये सादर करण्यात आला होता. या नेकलेसमधील फक्त एक मगर बनवण्यासाठी हजाराहून अधिक फॅन्सी पिवळे हिरे वापरण्यात आले आहेत. यामध्ये १८ कॅरेट पिवळे सोनेदेखील वापरले आहे.
नेकलेसमध्ये ६०.२ कॅरेटचा वापर करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या मगरीमध्ये १८-कॅरेट पांढरे सोने वापरण्यात आले असून त्यावर ६६.८६ कॅरेट वजनाचे पाचू लावण्यात आले आहेत. मॅक्सिन अभिनेत्री मारा फेलिक्सनेही असाच मगरीचा हार घातला होता. १९८० मध्ये त्यांनी गळ्यात दोन मगरींचा हार घालून सर्वांना चकित केले होते.