अभिनेत्री विद्या बालन लवकरच ‘नीयत’ या थ्रीलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या अभिनेत्री या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. या प्रमोशनदरम्यान विद्या बालननं तिच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. तिच्यावर मुंबईतील एका 5 स्टार हॉटेल बाहेर भीक मागण्याची वेळ आली होती, याबाबत तिनं सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॅशेबल (Mashable) या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना विद्यानं तो किस्सा सांगितला. ती म्हणाली की, “आमचा आयएमजी म्हणजेच इंडियन म्युझिक ग्रुप होता. हा ग्रुप दरवर्षी इंडियन क्लासिक म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करायचा. हा कॉन्सर्ट तीन दिवसांचा असायचा. संपूर्ण रात्रभर हा कॉन्सर्ट चालायचा. मी याच्या ऑर्गनाइजिंग कमिटीमध्ये होते. मी एक वॉलेनटिअर म्हणून काम करायचे. आम्ही प्रोग्रोम ऑर्गनाइज करण्यात हातभार लावायचो. जेव्हा रात्री शो संपायचा तेव्हा आम्ही नरिमन पॉईंटला फिरण्यासाठी जायचो.”

हेही वाचा – ए आर रेहमान: हिंदू ज्योतिषानं दिलीप कुमारला सुचवलं मुस्लीम नाव; रेहमान यांनी सांगितली आठवण…

“एकेदिवशी मला चॅलेंज दिलं गेलं. मला ‘ओबेरॉय-द पाम्स’ (Oberoi-The Palms)च्या कॉपी शॉपचा दरवाजा ठोठवून त्यांच्याकडून खायला मागण्यासाठी सांगितलं. मी तेव्हा अभिनेत्री होती, त्यांना ही गोष्ट माहित नव्हती. मी दरवाजा सतत ठोठावू लागले. तिथले सर्व लोकं चिडू लागले. मी खूप वेळा दरवाजा ठोठावला. त्यानंतर मी म्हणाले की, ‘प्लीज, मला भूक लागली आहे. मी कालपासून काही खाल्लं नाही.’ हे पाहून, माझ्या मित्रांना लाज वाटायला लागली. त्यांनी मला परत बोलवून घेतलं. अशाप्रकारे मी हे चॅलेंज जिंकलं होतं.”

हेही वाचा – “मी कधीच बोल्ड सीन्स देत नाही कारण…”, ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

पुढे विद्यानं हे चॅलेंज का दिलं होत, याच कारण सांगतं म्हणाली की, “हे चॅलेंज जिम जॅम बिस्किटसाठी लावण्यात आलं होतं. कॉन्सर्टसाठी आमचा स्पॉन्सर ब्रिटानिया होता. आमच्याकडं खूप बिस्किट होती. परंतु मी मित्रांना सांगितलं होत की, जर मी चॅलेंज जिंकलं, तर मला जिम जॅमचं अधिकच पॅकेट मिळेल. आणि ते मला मिळालं होतं.”

हेही वाचा – लग्नापूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पोहोचले अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात; व्हिडीओ समोर

दरम्यान, विद्या बालन ‘नीयत’ या चित्रपटात डिटेक्टिवच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपानिता शर्मा आणि निकी वालिया असे अनेक पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress vidya balan reveals begging at a five star hotel pps