बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. नुकताच तिचा ‘नीयत’ हा थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या विद्या चर्चेत असून, चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. यानिमित्ताने अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या पहिल्या कामाचा व मानधनाचा किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कर्ली टेल्स’ या यूट्यूबरनं नुकतीच विद्या बालनची मुलाखत घेतली. त्यावेळेस अभिनेत्रीला विचारलं, “तुला तुझं पहिलं काम आणि पहिल्या मानधनाचा चेक लक्षात आहे का?” त्यावर विद्या बालन म्हणाली, “होय. माझ्या पहिल्या मानधनाचा चेक ५०० रुपयांचा होता. ते एक छोटंसं प्रिंट कॅम्पेन म्हणजे एक केरळ पर्यटनाची जाहिरात होती. त्यांना दक्षिण भारतातील एका कुटुंबाचा फोटो पाहिजे होता. त्यामुळे आम्ही कालिना येथील एका नारळाच्या झाडाखाली फोटो काढले आणि त्यासाठी मला ५०० रुपये देण्यात आले होते; जे माझं पहिलं मानधन होतं.”

हेही वाचा – बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व दोन आठवड्यांसाठी वाढवलं; जाणून घ्या कारण ….

हेही वाचा – “मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक?” केदार शिंदेंनी ‘ती’च्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “तिची निवड झाली नाही तर…”

या मुलाखतीत विद्यानं तिच्या शाळेच्या आठवणींनाही उजाळा दिला. शाळेत असताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी विद्याची सीनियर होती. शिवाय शिल्पा विद्याला बास्केटबॉल शिकवत असे. याविषयी विद्यानं सांगितलं, “शाळेत असताना शिल्पा माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी होती आणि ती खूप हॉट होती; शिवाय ती एक बास्केटबॉल खेळाडू होती. एके दिवशी माझ्याही आईला वाटलं की, मीसुद्धा बास्केटबॉल खेळावं. मला तिनं पहाटे ६ वाजता उठवून बास्केटबॉल खेळायला पाठवलं. त्या वेळेस शिल्पा चित्रपटात काम करू शकते, अशा चर्चा सुरू होत्या; पण ती खूप चांगली होती. तिनं मला बॉल ड्रिबल करायला शिकवलं. त्यानंतर मला असं वाटू लागलं की, मला आता सगळंच यायला लागलं. म्हणून मी आईला जाऊन सांगितलं की, मी आता सर्व काही शिकले. उद्यापासून मी जाणार नाही. “

हेही वाचा – कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाची ११ व्या दिवशी दमदार कमाई; ‘आदिपुरुष’ला टाकलं मागे

दरम्यान, ‘मिशन मंगल’नंतर विद्या बालन चार वर्षांनंतर ‘नीयत’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या चित्रपटात डिटेक्टिव्ह मीरा रावची भूमिका तिने साकारली आहे. अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालनव्यतिरिक्त राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपानिता शर्मा व निकी वालिया हे कलाकार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress vidya balan talks about first paycheck pps