बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी आज देशभरातून अनेक कलाकार येत असतात. शाहरुख खान ते कंगनापर्यंत, या सर्व मुंबई बाहेरच्या कलाकारांनी आपले स्थान निर्माण केले आहे. विकी डोनर चित्रपटातून तरुणांची क्रश असलेली अभिनेत्री यामी गौतम देखील आपले करियर करण्यासाठी मुंबईत आली आणि आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. एका मुलाखतीत तिने आपल्या मुंबईतील अनुभव सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉम्बे जर्नी या कार्यक्रमात अनेक बॉलिवूडचे सेलिब्रेटी येत असतात. मुंबईबद्दलचे अनुभव या कार्यक्रमात सांगत असतात. यामी मुंबईबद्दल सांगताना म्हणाली, ‘पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हाडोक्यात मुंबईबद्दलच्या अनेक कल्पना होत्या, चित्रपटात दाखवल्याप्रमाणे इथे सगळी घरे समुद्रजवळ असतील सगळी घरे आलिशान आणि मोठी असतील मात्र प्रत्यक्षात इथे आल्यावर परिस्थिती वेगळी होती. इथे राहणारी लोक जशा अवस्थेत आहेत तसेच राहतात. इथे सगळे परिस्थितीशी जुळवून घेणारे आहेत. माझी ऑडिशन होती मी आले होते आणि पहिल्याच फेरीत निवडले गेले होते’.

“आमच्या घरातील बिग बॉस… “; शाहरुखची पत्नी गौरी खानने केला खुलासा

यामी मूळची हिमाचल प्रदेशातील आहे, तिने आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे. २००८ साली ती मुंबईत दाखल झाली आहे. चित्रपटांच्या आधी तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. ‘उरी’सारख्या चित्रपटातून तिने एक कणखर ऑफिसरची भूमिका साकारली तर ‘अ थर्सडे’सारख्या चित्रपटातून एका मनोरुग्णाची भूमिकाही तिने उत्तम साकारली.

उरीचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. ‘बाला’, ‘भूत पोलीस’, ‘काबील’, ‘बदलापूर’ यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुरवातीला तिने मालिकांमध्येदेखील काम केले आहे. .

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress yami gautam share her expirence about mumbai life in bombay journey show spg
Show comments