दीपिका पदुकोण, क्रिती सॅनॉन, कतरीना कैफ, आलिया भट्ट या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. या अभिनेत्री अभिनयाप्रमाणेच आपल्या ग्लॅमर्स व बोल्ड लूकसाठीदेखील चर्चेत असतात. मात्र बॉलिवूडमध्ये बोल्डनेस सुरु झाला तो ७०-८० च्या दशकात, अभिनेत्री झीनत अमान या त्याकाळातील अभिनेत्री ज्या अभिनयापेक्षा बोल्डनेस आणि आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत राहिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९७० मध्ये त्यांनी ‘हंगामा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्या त्या बॉलिवूडमध्ये सक्रीय नाहीत. मात्र आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांनी स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केले आहे. इन्स्टाग्रामवर येताच त्यांच्या पहिल्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांनी स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. या वयातही त्यांच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता नाही हे दिसून येत आहे.

Video : घरी भेटले, निरोप घेताना गाडीतून उतरत शाहरुखने नयनताराला केलं किस

अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पदार्पणावर चाहत्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. तसेच कलाकारांनी ईमोजी द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका चाहत्याने लिहले आहे, “तुम्हाला येथे पाहून खूप आनंद झाला.” दुसऱ्याने लिहले आहे “मॅडम तुमच्याबरोबर काम करायचे आहे.” तसेच आणखीन एकाने लिहले आहे “बॉलिवूडमधील नैसर्गिक सौंदर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे तुम्ही”, अशा प्रतिक्रिया येत आहेत.

झीनत अमान यांनी आपल्या कारकिर्दीत ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’, ‘यादों की बारात’, ‘दोस्ताना’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले होते. त्यांची आणि अमिताभ बाचं यांची जोडी प्रसिद्ध होती. करिअरप्रमाणे त्यांचे खासगी आयुष्यदेखील कायम चर्चेत राहिले. करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी लग्न केलं, पण त्यांची दोन्ही लग्न अयशस्वी राहिली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress zeenat amaan debut instagram account and shared photo spg