‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा, आजवर तिने वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच तिचा ‘डबल एक्सएल’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेश या चित्रपटातून लठ्ठ महिलांची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट बॉडी शेमिंगसारख्या विषयावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी तिला वजन वाढवण्यास सांगितले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले ‘आम्हा अभिनेत्रींना प्रत्येक चित्रपटाच्या वेळी सांगण्यात येते की आणखीन थोडे वजन कमी करा, या चित्रपटाच्याबाबतीत हा प्रकार घडला नाही. कारण या चित्रपटासाठी आम्हाला वजन वाढवायचे होते. चित्रपटाच्या वाचनाच्या दरम्यान आम्ही खूप वेगवेगळे पदार्थ खात होतो. या चित्रपटासाठी मी १७ किलो वजन वाढवले होते. माझ्या पूर्ण करियरमध्ये असा चित्रपट झाला नाही कारण मला कायम वजन कमी कर हेच सांगत असतं. या चित्रपटाचे कथानक माझ्याशी मिळतेजुळते आहे’. एक छान संदेश या चित्रपटातून आम्ही देणार आहोत’.

पुरुष माझ्यावर… ” मुलाखतीदरम्यान मल्लिका शेरावतने केला खुलासा

सोनाक्षीने ‘आर राजकुमार’, ‘अकिरा’ ‘लुटेरा’, ‘मिशन मंगल’ यांसारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या म्हणून असली तर तिने बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा कायमच आपल्या लूकमुळे चर्चेत असते. सोनक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल मागच्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहेत. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून सुरू होत्या.

हा एक विनोदी चित्रपट असून तो ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी आणि हुमाच्या त्यांच्यासोबत अभिनेता झहीर इक्बाल आणि महत राधवेंद्र दिसणार आहेत. या दोन कलाकारांशिवाय या चित्रपटात क्रिकेटर शिखर धवनही दिसणार आहे. शिखर या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actresss sonakshi sinha opene up about why she choose double xl film spg