बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि तिची लेक आराध्या बच्चन या दोघींचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. कधी पार्टीतले व्हिडीओ तर कधी विमानतळावरील व्हिडीओ या मायलेकीचे चर्चेत असतात. सध्या या मायलेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोघी डान्स करतानाचा दिसत आहेत.

ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चनचा हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोघी डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ खूप जुना आहे, पण तो पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये ऐश्वर्या काळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसत आहे, तर आराध्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. दोघी मनसोक्त डान्स करत आहेत. तसेच त्यांच्या बाजूला अभिनेत्री जिनिलीया डिसूजा-देशमुख देखील डान्स करताना पाहायला मिळत आहे. पण ऐश्वर्या लेकीला जवळ घेऊन डान्स करताना दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांना ते खटकलं आहे.

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”

हेही वाचा – मिचौंग चक्रीवादळामुळे चेन्नईत अडकलेला आमिर खान, दाक्षिणात्य अभिनेत्याने शेअर केले बचावकार्याचे फोटो

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकरीने लिहिलं आहे, “ही कधी अभ्यास करते? सगळीकडेच हिला का घेऊन जाते?” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “कधी तरी मुलीला एकटीला सोड.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “एवढीच जर तिची काळजी वाटतं असेल तर घरातून घेऊन येतेस तरी का?”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’च्या सेटवर आहे इच्छाधारी नागिन, अभिनेत्री जुई गडकरी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत म्हणाली…

दरम्यान, गेल्या महिन्यात १६ तारखेला आराध्या बच्चनचा १२वा वाढदिवस साजरा केला होता. या दिवशी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या लेकीसाठी खास पोस्ट शेअर केली होती.

Story img Loader