अभिनेत्री आलिया भट्टचा ( Alia Bhatt ) नवा ‘जिगरा’ चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामुळे ती सध्या चर्चेत आहे. ‘जिगरा’ चित्रपटात आलियासह वेदांग रैना प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या दोघं ‘जिगरा’ चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यात आलिया वेदांगसह चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित राहिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच हैदराबादमध्ये ‘जिगरा’ चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटला आलिया, वेदांगसह अभिनेत्री समांथा रुथ प्रभु, राणा दग्गुबाती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक त्रिविक्रिम श्रीनिवास यांनी उपस्थिती लावली होती. या इव्हेंटमधील आलियाचे ( Alia Bhatt ) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी आलियाच्या एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये अभिनेत्री ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ गाणं गाताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकला नसला तरी रितेश देशमुखने अभिजीत सावंतला दिली खास ट्रॉफी, गायक म्हणाला, “भाऊंनी…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया भट्ट ( Alia Bhatt ) समांथा रुथ प्रभूसमोरचं तिचं लोकप्रिय गाणं ‘ऊ अंटावा’ गाताना पाहायला मिळत आहे. आलिया गाण्याआधी समांथाला म्हणते, “मी हे गाणं गाणार, कारण सॅम इथे आहे. मी याआधी कधीही गायलं नव्हतं. त्यामुळे हे फक्त तुझ्यासाठी आहे. मला कधीच या ओळींचा अर्थही माहीत नव्हता.” त्यानंतर आलिया गाते आणि तिचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी समांथा टाळ्या वाजवताना दिसत आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : …म्हणून गुणरत्न सदावर्तेंनी ‘बिग बॉस’च्या घरात घातला गोंधळ, म्हणाले, “मी अन्न आणि पाणी…”

हेही वाचा – रतन टाटांच्या निधनानंतर बॉलीवूड कलाकारांनी केला शोक व्यक्त, सलमान खानसह प्रियांका चोप्राने केल्या भावुक पोस्ट, म्हणाले…

दरम्यान, ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या आलिया भट्टच्या ( Alia Bhatt ) ‘जिगरा’ चित्रपटात वेदांग व्यतिरिक्त शोभिता धुलिपाला, मनोज पाहवा आणि रवि किशन महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट वासना बाला यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये आलियाने सत्या आनंदची भूमिका साकारली आहे; ही एक तरुण मुलगी असून तिला बालपणापासून अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. तिच्या आयुष्यात फक्त एकच आपलीशी व्यक्ती आहे, तो म्हणजे भाऊ अंकुर ( वेदांग रैना ). एकेदिवशी अंकुर परदेशात जेरबंद होतो. त्यानंतर अंकुरला वाचवण्यासाठी बहीण एक हिरो होऊन अनेक गोष्टींचा सामना करताना दाखवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood alia bhatta sing oo antava song for samantha ruth prabhu pps