बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आई कमला छाबरा यांचे निधन झाले. कमला छाबरा यांनी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. १४ एप्रिल रोजी त्यांच्या आईवर मुंबईतील ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. छाबरा यांच्या आईच्या निधनाची बातमी कळताच फराह खान, दीपिका पदुकोण, अपारशक्ती खुराना आणि नुपूर सेनन यांसारखे अनेकनेक कलाकार रुग्णालयात दाखल झाले आहेत.
हेही वाचा- दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर
मुकेश छाबरा हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहेत. केश छाबरा यांनी सलमान खानबरोबर ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’, ‘कीक’ अशा वेगवेगळ्या चित्रपटासाठी काम केलं आहे. गेली १३ वर्षं ते सलमान खानसाठी काम करत आहेत. सलमानच्या आगामी काही प्रोजेक्टवरही मुकेश छाबरा काम करत आहेत. त्यांनी सलमान खानबरोबरच शाहरुख खानसह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या चित्रपटांसाठी कास्टिंग केले आहे. त्यांनी सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटासाठी कलाकारांची निवड केली होती.
याशिवाय मुकेश यांनी सलमानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटासाठीदेखील कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. त्यांनी ‘दिल बेचारा’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल होतं. सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा चित्रपट होता.