गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, तसेच कित्येक उद्योगपती आपल्या घरी गणपती बसवतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या ‘अँटिलिया’स्थित घरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबानी यांच्या घरी पहिल्याच दिवशी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. ‘जवान’च्या यशानंतर किंग खान शाहरुख खान हा सहकुटुंब अंबानी यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आला. यावेळी शाहरुखबरोबर मुलगा अबराम, मुलगी सुहाना खान, पत्नी गौरी खान व गौरीची आई सविता छिब्बर या देखील उपस्थित होत्या. बऱ्याच दिवसांनी शाहरुखने सहकुटुंब एखाद्या सोहळ्याला हजेरी लावली अन् मीडियासमोर फोटोदेखील काढले.

आणखी वाचा : ‘घुमर’ व ‘द केरला स्टोरी’ यंदा ऑस्करसाठी जाणार? ‘या’ दिवशी फिल्म फेडरेशन जाहीर करणार चित्रपटांची यादी

शाहरुखबरोबर सलमाननेही अंबानी यांच्या घरी दर्शनासाठी हजेरी लावली. सलमानचा लूक चांगलाच चर्चेत होता. आमिर खान स्वतः उपस्थित नसला तरी त्याचा मुलगा जुनैद व मुलगी आयरा यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. याबरोबरच सारा अली खान व इब्राहिम खान यांनीही बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावल्याचं दिसलं.

याबरोबरच ‘जवान’फेम नयनताराने पती विघ्नेशसह हजेरी लावली तर दीपिका पदूकोण व रणवीर सिंगच्या जोडीने एक वेगळीच धमाल आणली. याबरोबरच आलिया भट्ट, करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी, विकी कौशल, अयान मुखर्जी, ऐश्वर्या राय, रवीना टंडन, शाहिद कपूर, क्रिकेटर हार्दिक पांड्या व त्याचे बंधु यांनीही अंबानी यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood celebrities visits mukesh ambani house antilia to seek blessings of ganpati bappa avn