बॉलिवूडमधील जोडप्यांची कायमच चर्चा असते. शाहरुख गौरी, रितेश जिनिलिया, सैफ करीना नुकतेच लग्न झालेले रणबीर आलिया, विकी कतरीना या जोडप्यांचे लाखो चाहते आहेत. मात्र सध्या एकाच जोडप्याची चर्चा आहे ते जोडपं म्हणजे सिद्धार्थ कियारा, नुकतेच दोघे ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात येऊन गेले होते या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली. नुकतच सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितले ‘आता आमच्यात काही लपवण्यासारखे नाही’. आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे अशी चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार हे जोडपं ६ एप्रिल २०२३ रोजी विवाह बंधनात अडकतील. बॉलिवूड लाइफ सूत्रांनी सांगितले की ‘दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. दोघांना बंधनात अडकण्याची घाई लागली आहे. त्यांचा विवाह सोहळा दिल्लीत पार पडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे’. दोघांच्या घरातील लोकांनी लग्नाची तयारी करण्यास सुरवात केली आहे. दोघे पहिले कोर्टात लग्न करणार आहेत त्यानंतर नातेवाईक, पाहुण्यांसाठी स्वागत समारंभ ठेवणार आहेत.
“महाराजांचा उल्लेख एकेरी…”; शरद केळकरने पत्रकाराला पुन्हा एकदा रोखलं
२०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. तेव्हापासून ही दोघे एकमेकांना डेट करू लागले. नुकतेच दोघे एका जाहिरातीत झळकले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. सध्या ते दोघे एकत्र वेळ घालवत आहेत. सिद्धार्थ कियारा नुकतेच दोघे एकत्र एका पार्टीत दिसले. अश्विनी यार्दी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत ते दोघे एकत्र येताना दिसले. पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर विद्वांस या मराठमोळ्या दिग्दर्शकावर आहे.‘शेरशाह’ चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एका सैनिकाचे पात्र साकारणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘योद्धा’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ सैन्यातील एका जवानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.