दिग्दर्शक अनुराग कश्यपचा गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला ‘दोबारा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. यानंतर अनुराग कश्यप ‘केनेडी’ या चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कान्स’ चित्रपट महोत्सवामध्ये अनुरागच्या ‘केनेडी’चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. कान्स महोत्सवात केनेडी चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि प्रेक्षकांकडून ७ मिनिटांचे स्टॅंडिंग ओव्हेशन मिळाले. यादरम्यान ‘केनेडी’चित्रपटात चार्लीच्या भूमिकेसाठी सनी लिओनीला कास्ट का केले? याबाबत दिग्दर्शक अनुराग कश्यपने खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जानकी’च्या भूमिकेबद्दल अभिनेत्री क्रिती सेनॉन म्हणाली, “कारकिर्दीत सहसा…”

सनी लिओनीबद्दल अनुराग कश्यप म्हणाला, “मी शपथ घेऊन सांगतो आजवर मी तिचा एकही चित्रपट पाहिला नव्हता, परंतु मी तिच्या काही मुलाखती पाहिल्या होत्या. तिच्या डोळ्यात काहीशी उदासीनता आहे. ‘केनेडी’चित्रपटासाठी मी ४० वर्षांची स्त्री, जी पुरुषांना आकर्षित करेल आणि ५० ते ६० वर्षांपर्यंतच्या पुरुष अभिनेत्याच्या शोधात होतो. मला ‘चार्ली’च्या भूमिकेसाठी अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी सनी लिओनीमध्ये होत्या. केवळ पैशांसाठी नाही तर चित्रपटाची कथा ऐकून तिने मला होकार कळवला.”

हेही वाचा : Video : विराटची बुद्धिमत्ता पाहून अनुष्का झाली थक्क! पत्नीला बिझनेसची ऑफर देत कोहली म्हणाला, “कभी धोखा नहीं दूंगा…”

अनुराग कश्यप पुढे म्हणाला, “जेव्हा सनीला मी या भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा ती मला म्हणाली, तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार करत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. यानंतर तिने भूमिकेसाठी होकार कळवला आणि या भूमिकेसाठी सनी लिओनीने प्रचंड मेहनत घेतली आहे.”

हेही वाचा : वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर होणाऱ्या पतीने केली भावुक पोस्ट; म्हणाला, “RIP मेरी गुंडी…”

अनुराग कश्यपसोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत सनी लिओनी म्हणाली, “एका अभिनेत्याकडून काय हवे आहे हे त्यांना बरोबर माहिती असते. ऑडिशन देताना मी खूप घाबरले होते कारण, अनुराग कश्यपने संपूर्ण ऑफिसला फोन करून माझी ऑडिशन पाहण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर सर्वांना मी ही भूमिका योग्यरितीने करू शकते का? असा प्रश्नही केला होता. यानंतर माझी या भूमिकेसाठी निवड झाली.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood director anurag kashyap on taking sunny leone in film kennedy sva 00