काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडममधील ‘नेपोटिझम’ हा मुद्दा प्रचंड चर्चेत आला होता. या गोष्टीवरून निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. करणने कायमच स्टार किड्सना संधी दिली आहे. आलिया भट्ट, वरूण धवन, अर्जुन कपूर यांच्यावर टीका झाली होती. एकूणच घराणेशाही यावरून बॉलिवूडवर अधूनमधून टीका होत असते. यावरच आता अनुराग कश्यपने भाष्य केलं आहे.
अनुराग कश्यप हा असा दिग्दर्शक आहे ज्याचे नाव बॉलिवूडमधल्या चतुरस्त्र दिग्दर्शकांच्या यादीत घेतले जाते. ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’, ‘रमन राघव 2.0’ आणि ‘देव.डी’ यांसारख्या विविध चित्रपटासांठी ओळखला जातो. चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचे समर्थन केले आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला, “मुळात आपला देश घराणेशाहीवर आधारित आहे. एक डॉक्टर हॉस्पिटल उघडतो आणि अनेक डॉक्टरांना काम देतो पण त्याच्या मुलाला डॉक्टर होण्यासाठी प्रशिक्षण देतो आणि त्याला हॉस्पिटल देतो. कोणताही दुकानदार आपले दुकान कर्मचाऱ्याला देत नाही; तो त्याचा मुलगा मोठा झाल्यावर त्याला देतो. याला तुम्ही घराणेशाही का म्हणत नाही? मुलांना फायदा होतो कारण वडिलांनी कष्ट घेतलेले असतात.”
“देशात सकारात्मक भावना…” ‘पठाण’ला विरोध करणाऱ्यांना अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा डिवचले
तो पुढे म्हणाला, “जे आम्हाला मिळत नाहीत ते मुलांना द्यायचा प्रयत्न करतो. त्यानंतर ही मुलांची निवड आहे. अनेकांना चित्रपटात येण्याची इच्छा नसते. माझ्या भावाने आणि बहिणीने चित्रपटात प्रवेश केला पण स्वतंत्रपणे चित्रपट केले. त्यांनी माझ्यासोबत चित्रपट केले नाहीत. देव डी आणि गँग्स ऑफ वासेपूरमध्ये माझ्या बहिणीने मला मदत केली. तिला १० वर्षे लागली पण तिने स्वतः एक चित्रपट बनवला.”
स्टार किड्सविषयी बोलताना तो म्हणाला,” ज्यांचे कुटुंब चित्रपटसृष्टीतलं आहे त्या कुटुंबातील अभिनेत्यांवर टीका झाली नाही कारण त्यांच्याकडे प्रतिभा होती. अगदी रणबीर कपूर आणि हृतिकला अनेक सुविधा मिळाल्या. त्यांना कोणी काही का बोलले नाही? कारण त्यांच्यात इतकी प्रतिभा आहे की ती दिसून येते. अडचण ही आहे की जे प्रतिभाहीन आहेत त्यांना संधी मिळते आणि चांगल्या कलाकारांना संधी मिळत नाही, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.