करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील आलिया भट्ट आणि रणवीर सिंहच्या कामचं कौतुक केलं जात आहे. शिवाय ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या केमिस्ट्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोघांचा किसिंग सीन चांगलाच चर्चेचा विषय बनला होता. अशात करण जोहरनं ३५ वर्षांनंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा रिमेक केला तर तो धर्मेंद्र आणि शबाना आझमीच्या जागी कोणाची निवड करेल, याचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ‘या’ फोटोमुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली व निमिषच्या अफेअरच्या चर्चांना आलं होतं उधाण

करण जोहर सोमवारी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘एक्स्प्रेस अड्डामध्ये’मध्ये सहभागी झाला होता. यावेळी अभिनेत्री अनन्या पांडेनं करणबरोबर रॅपिड फायर हा गेम खेळला. त्यावेळी अनन्यानं करणला विचारलं की, “जर ३५ वर्षांनंतर ‘रॉनी और रानी की प्रेम कहानी’चा रिमेक केलास तर तू धर्मेंद्र आणि शबाना आझमीच्या जागी कोणाची निवड करशील” यावर क्षणाचा ही विलंब न करता करण जोहर म्हणाला की, “शाहरुख खान आणि काजोल.

हेही वाचा – हार्दिक जोशीला ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका मिळाल्यानंतर पत्नी अक्षयाची काय होती पहिली रिअ‍ॅक्शन? जाणून घ्या

याशिवाय करणला ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या रिमेकविषयी विचारलं. त्यावर करण म्हणाला की, “यासाठी मी आलिया आणि रणवीरची प्रमुख भूमिकेसाठी निवड करेन.” यावर लगेच अनन्या म्हणाली की, “पू (पूजा) भूमिकेसाठी माझा विचार केला जाऊ शकतो. कारण मला या भूमिकेचे सगळे डायलॉग पाठ आहेत.” यानंतर करण म्हणाला की, “याबाबत मला करीना कपूरची परवानगी घ्यावी लागेल.”

हेही वाचा – “माझ्या पदरात…” अभिनेता संतोष जुवेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाला, “बाप्पा…”

दरम्यान, करण ‘रॉनी और रानी की प्रेम कहानी’नं भारतात जवळपास १४०.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर १४२ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात आलिया, रणवीर, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याव्यतिरिक्त जया बच्चन, तोता रॉय चौधरी, चुन्नी गांगुली, क्षिती जोग हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.