बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती करत रोहितने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रोहित अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शेट्टीने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत रोहितने कॉलेज जीवन, वैयक्तिक आयुष्य व बॉलिवूडबद्दल भाष्य केलं. रोहितला या मुलाखतीत पोलिसांशी असलेल्या जवळीकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “तुमचे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला पोलिसांविषयी प्रेम असल्याचं जाणवतं. तुम्ही पोलीस अधिकारी झालात, तर कोणत्या गोष्टी करायला आवडतील?” असा प्रश्न रोहित शेट्टीला विचारण्यात आला. “पोलिसांचा काम हे फार तणावपूर्ण आहे. त्यामुळे मला पोलीस अधिकारी बनायचं नाही,” असं उत्तर रोहितने दिलं.

हेही वाचा>> “गँग्स ऑफ वासेपूर आणि मिर्झापूरमध्ये…”, वनिता खरात नेमकं काय म्हणाली?

रोहित शेट्टी पुढे म्हणाला, “पोलिसांचा जॉब करणं कठीण आहे. चित्रपटाव्यतिरिक्तही मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. मुंबईसारख्या शहरात काम करणं फार जास्त तणावपूर्ण आहे. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे या शहराची व्यवस्था बघणं सोपं नाही. पोलिसांचं आयुष्य फार अवघड आहे. मी अशा काही पोलिसांना ओळखतो ज्यांना कधी कधी कामामुळे ४८ तास त्यांना घरी जाता येत नाही. ताज हॉटेलमध्ये झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडे जावं लागलं होतं. त्या काळात ते अशा भयानक परिस्थितीतून गेले होते.”

हेही वाचा>> ड्रग्ज तस्करी प्रकरणात UAEमध्ये अटक झालेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कोण?

“सिंघम चित्रपटामुळे मी अनेक पोलिसांबरोबर काम केलं. तेव्हा पोलिसांची ही दुसरी बाजू माझ्या लक्षात आली. त्यांच्याकडूनही मला खूप प्रेम मिळालं. आमच्यात एक वेगळं बाँडिग तयार झालं. समाजात चांगले वाईट दोन्ही लोक आहेत. पोलीस भ्रष्टाचारी असतात, असंही काही लोक म्हणतात. फक्त एक दिवस पोलिसांनी काम करायचं नाही असं ठरवलं, तर शहर जंगल बनेल,” असंही पुढे रोहित शेट्टी म्हणाला.

हेही वाचा>> Video : चिमुकल्याचा डान्स पाहून अंकुश चौधरी भावुक, डोळे पाणावले अन्…; व्हिडीओ व्हायरल

रोहित शेट्टीची निर्मिती असलेला ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री तेजस्वी प्रकाश व करण किशोर मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता जितेंद्र जोशीनेही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood director rohit shetty talk about police life in mumbai said its very difficult job kak