गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी अचानक इस्रायलवर हल्ला केला. ‘हमास’च्या या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझा पट्टीवर अनेक हवाई हल्ले केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी ‘हमास’ विरोधात युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: इस्रायलवर हल्ला होण्यापूर्वीचा नुसरत भरुचाचा व्हिडीओ समोर

राखी सावंतचा हा व्हायरल व्हिडीओ ‘बॉलीवूड नाउ’ या एंटरटेन्मेंट मीडियाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, राखीला विचारलं जात की, इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध सुरू आहे? नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती, आता ती भारतात परतली आहे. तर यावर तुझी प्रतिक्रिया काय आहे? राखी म्हणते, “नुसरत भरुचा हिचं इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धात काय काम होतं? मला तर असं वाटतं, नुसरत भरुचा स्वतः एक तोफ आहे. तिथे युद्ध सुरू आहे. त्यामुळे ती नक्की कोणाच्या बाजूने गेली होती इस्रायल की पॅलेस्टाईन?”

राखीच्या या प्रश्नावर पापराझी म्हणतात की, ती भारतातून शूट करण्यासाठी गेली होती. पण नुसरत आता सुखरुप परतली आहे. यावर राखी म्हणते, “ती सुखरुप परतली यासाठी मी देवाचे आभार मानते. पण ठीक आहे. इस्रायल जिंकेल, काही चिंता नाही. पण एकेदिवशी युद्ध सगळीकडेच होणार आहे. मात्र भारतात युद्ध होणार नाही. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत आपल्या भारतात युद्ध होणार नाही.”

हेही वाचा – “आपल्या इतिहासात चंदन अन् कोळसा आहे, मी… ” दिग्पाल लांजेकरांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाले…

हेही वाचा – Video: शर्मिष्ठा राऊतचे ‘हे’ शब्द ऐकताच स्वप्नील जोशी झाला थक्क; मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हे शब्द भाषेमधून काढून टाका”

दरम्यान, आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धात दोन्ही बाजूचे मिळून तब्बल ११०० मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. इस्रायलमध्येच ७०० नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. त्याशिवाय, मृतांमध्ये ४४ सैनिकांचाही समावेश आहे. दुसरीकडे गाझा पट्टीत किमान ४०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood drama queen rakhi sawant reaction on israeli palestinian war pps
Show comments