बॉलीवूड अभिनेता इम्रान खान सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर असला तरी अनेकदा चर्चेत राहिला आहे. बॉलीवूडमधील त्याच्या करिअरची सुरूवात ते त्याला मिळालेल्या प्रसिद्धीपर्यंतचा त्याचा प्रवास काही सोप्पा नव्हता. आमिर खानचा भाचा असला तरी त्याला स्ट्रगल काही चुकला नव्हता. इम्रानने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याच्यासाठी गोष्टी अचानक कशा बदलल्या याबद्दल त्याने सांगितलं आहे.

इम्रानने सांगितलं की, पूर्वी त्याला नॉन व्हेज खायचं असल्यास त्याला बाहेर बसायला सांगायचे,पण ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्याच नॉन व्हेज जेवणासाठी आता त्याला एसी लाउंजची ऑफर दिली जात होती.

हेही वाचा… ‘बायबल’ शब्द वापरल्यामुळे करीना कपूरला कायदेशीर नोटीस, ‘त्या’ पुस्तकामुळे अडचणीत सापडली अभिनेत्री

इम्रानने सांगितलं की त्याचं ‘जाने तू या जाने ना’ आणि ‘किडनॅप’ या दोन्ही चित्रपटांचं शूटींग झालं होतं. ‘जाने तू या जाने ना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. त्यादरम्यान जेव्हा ‘किडनॅप’च्या डबिंगवेळेस त्याला नॉन व्हेज खायचं होतं म्हणून तेव्हा नाईलाजाने त्याला स्टुडिओबाहेर प्लास्टिकच्या खुर्चीवर बसाव लागलं होतं. अभिनेता म्हणाला, “एकदा मी माझ्यासाठी नॉन व्हेज जेवण मागवलं होतं तेव्हा त्यांनी मला स्टुडिओत जेवायला दिल नाही. त्यांनी मला प्लॅस्टिकची खुर्ची दिली आणि जिथे बाहेर पार्किंगसाठी गाड्या उभ्या असतात तिथे ती खुर्ची ठेवली आणि मी तिथे जेवलो.”

हेही वाचा… बालपणीच्या गौरव मोरेला पाहिलंत का? फिल्टरपाड्याच्या बच्चनने शेअर केला शाळेतला फोटो, म्हणाला…

अभिनेता पुढे म्हणाला की, “जाने तू या जाने ना चा ट्रेलर रिलीज होईपर्यंत त्याने काही आठवडे पार्किंगमध्येचं जेवण केलं.त्यानंतर परिस्थिती बदलली आणि लोकांच्या वर्तनात अचानक बदल झाले. मी बाहेर पडायचो तेव्हा तिथे मटन बिरयाणी, प्लेट्स, चमचे घेऊन अशी माणसं उभी असायची आणि मला म्हणायची की सर तुम्ही कृपया एसी लाउंजमध्ये बसा.”

“अचानक झालेल्या बदलाबद्दल विचार करून मला यावर विश्वासच बसेना. ज्या लोकांनी तीन आठवडे मला स्टुडिओबाहेर प्लास्टिकच्या खुर्चीवर बसवलं आणि आता तीच लोकं अचानक मला सर सर महणतायत. या अचानक दिलेल्या प्रेमाला आणि आपुलकीला आपण किती मोल दिलं पाहिजे ते आपणचं ठरवावं.” असं इम्रान म्हणाला.

हेही वाचा… हॉलीवूड कलाकारानंतर आता बॉलीवूड स्टार हृतिक रोशनने केली अ‍ॅपलच्या ‘त्या’ जाहिरातीवर टीका; अभिनेता म्हणाला…

दरम्यान, इम्रानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, इम्रान शेवटचा २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात झळकला होता. अभिनेत्याने अद्याप त्याच्या कमबॅक चित्रपटाची घोषणा केलेली नाही.

Story img Loader