सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रंभाने हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांना आपलसं केलं. आता रंभाबाबत एक दुःखद गोष्ट समोर आली आहे. तिच्या गाडीला अपघात झाल असल्याची माहिती तिने स्वतःच सोशल मीडिया अकाऊंटद्वारे फोटो शेअर करत दिली. रंभाबरोबर गाडीमध्ये तिची मुलं तसेच मुलांना सांभाळणारी नॅनी होती. अपघात झालेल्या गाडीचे फोटोही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट केले आहेत. रंभा व तिच्या मुलांसाठी चाहतेही प्रार्थना करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अपघातानंतर काय म्हणाली रंभा?
रंभाने अपघातादरम्यानचे फोटो शेअर करत म्हटलं की, “मुलांना शाळेमधून घरी आणताना माझ्या गाडीला दुसऱ्या गाडीने धडक दिली. माझ्याबरोबर माझी मुलं आणि नॅनी होती. आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. किरकोळ जखम आहे. पण माझी लहान मुलगी साशा अजूनही रुग्णालयामध्ये आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेची आम्हाला गरज आहे.”

रंभाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या गाडीचंही बरंच नुकसान झालेलं दिसत आहे. शिवाय गाडीची अवस्था पाहिल्यानंतर हा अपघात मोठा होता हे दिसून येतं. रंभाने रुग्णालयामधील तिच्या मुलीचाही फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या मुलीवर उपचार होत असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – “माझ्याविषयी घाणेरड्या अफवा पसरवून…” मराठी ‘बिग बॉस’ फेम मीरा जगन्नाथची पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

रंभाने सलमान खानबरोबर ‘जुडवा’ चित्रपटामध्ये काम केलं. नव्वदच्या दशकामधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिचंही नाव होतं. इतकंच नव्हे तर तिने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या तरी तिच्या व तिच्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.