करियरच्या सुरवातीलाच नकारात्मक भूमिका त्यानंतर रोमँटिक हिरो अशी प्रतिमा बॉलिवूडमध्ये निर्माण करणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. आजवर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची चर्चा जोरदार आहे. नुकताच तो ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. याआधी तो झिरो चित्रपटात शेवटचा दिसला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाहरुख खानने आल्या करियरची सुरवात मालिकांपासून केली आहे. ‘सर्कस’ ‘फौजी’ या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. मागे एका मुलाखतीत त्याने सांगितले होते “मला लहानपणापासून लष्करात जायचे होते. कोलकाता शहरात एक सैनिकी प्रशिक्षण देणारी संस्थादेखील आहे मात्र तिथे केस कापायला लागतात म्हणऊन मी गेलो नाही.” ‘फौजी’ मालिकेत त्याला सैनिकाची भूमिका करायला मिळाली.

World Vegan Day : “आमच्या मुलाने…”; रितेश-जिनिलियाने सांगितले वेगन होण्याचे कारण

२००४ साली आलेल्या ‘मै हू ना’ चित्रपटात त्याने एका लष्करातील अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. मेजर रामप्रसाद असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव होते. त्यानंतर तो ‘वीर जारा’ चित्रपटात त्याने वायुदलातील अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘जब तक हैं जान’ चित्रपटात त्याने पुन्हा एकदा लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली.

शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘पठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ असे तीन चित्रपट आहेत. पुढच्या वर्षी त्याचे हे तिन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. फरहानच्या पोस्टवरून तरी दिसतंय की प्रेक्षकांना ‘डॉन ३’ची उत्सुकता आहे.