बॉलीवूड अभिनेता अरबाज खानने काल, २४ डिसेंबरला गर्लफ्रेंड शुरा खानबरोबर दुसरं लग्न केलं. अरबाजचा लग्नसोहळा त्याची बहीण अर्पिता खानच्या घरी पार पडला. यावेळी बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. तसंच या लग्नात अरबाजचा मुलगा अरहान खान देखील पाहायला मिळाला. यावेळी अरहानने खास परफॉर्मन्स केला. सध्या अरबाज-शुराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पण अशातच दुसऱ्या बाजूला अरबाजची पूर्वाश्रमीची पत्नी, अभिनेत्री मलायका अरोरा चांगलीच चर्चेत आली आहे.
काल अरबाज खान दुसऱ्या लग्नात व्यग्र होता तेव्हा मलायका चर्चबाहेर पाहायला मिळाली. मलायकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. काही वेळापूर्वी मलायकाने इन्स्टाग्रामवर ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. काही फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं की, ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना प्रेम, आनंद, चांगलं आरोग्य लाभो.
हेही वाचा – सविता मालपेकरांनी पहिल्यांदा दारुच्या ग्लासला हात लावला अन् त्यांना पाहून अशोक सराफ म्हणालेले…
मलायकाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये मेरी ख्रिसमस लिहिलेला केक हातात पकडून दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ख्रिसमस निमित्ताने सजलेला जेवणाचा टेबल पाहायला मिळत आहे. तसेच इतर फोटोमध्ये तिचा कुत्रा आणि मुलगा दिसत आहे. याच पोस्टवर चाहत्यांनी मलायकाची खिल्ली उडवली आहे.
एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, “तुझा नवरा तिकडे दुसरं लग्न करतो आणि तू इथे ख्रिसमस सेलिब्रेशन करतेय.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सांताने अरबाजला गिफ्ट दिलं…पण तू केकचं कापत राहिलीस.” तसेच इतर नेटकऱ्याने मलायकाच्या पोस्टवर अरबाजला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – Video: नव्या वहिनीबरोबर सलमान खान थिरकला ‘या’ गाण्यावर, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल
दरम्यान, अरबाज खानचं पहिलं लग्न मलायका अरोराबरोबर १९९८ साली झालं होतं. १९ वर्षांचा संसार केल्यानंतर अरबाज आणि मलायका विभक्त झाले. यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी हिला बराच काळ डेट करत होता. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण काही काळानंतर अरबाज शुराला डेट करू लागला. दोघांची मैत्री एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याचं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि काल दोघं लग्नबंधनात अडकले.