Bollywood : सिनेसृष्टीतल्या कलाकारांनी जाहिरातींमध्ये काम करणं ही बाब काही नवी बाब नाही. मागच्या अनेक वर्षांपासून सिने कलाकार जाहिरातींमध्ये काम करतात. सिनेमा हिट झाल्यानंतर अनेकदा अनेक स्टार मंडळींकडे तर जाहिरातींची रिघ लागते. आत्ताच्या घडीचे स्टार सलमान खान, शाहरुख खान यांच्यापासून रणबीर कपूर, रणवीर सिंग, आलिया भट्ट पर्यंत अनेक कलाकार हे जाहिरातीत दिसतात. या सगळ्यात अशोक कुमार आणि मीना कुमारी यांची एक जाहिरात व्हायरल होते आहे. ही जाहिरात ७२ वर्षांपूर्वीची आहे.

मीना कुमारी आणि अशोक कुमार यांची जाहिरात व्हायरल

theiconicarchives या इन्स्टा अकाऊंटने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मीना कुमारी या जाहिरातीत मीना कुमारी दिसते. पाठीमागून आवाज येतो, त्यानंतर अशोक कुमार येतात. डनलपच्या गादी आणि उशीची ही जाहिरात आहे. मीना कुमारी अशोक कुमारांच्या घरी गेली आहे. तिथे ते शूटिंगबाबत आणि सिनेमाविषयी बोलत असतात. त्यानंतर आवाज येतो की अशोक कुमार यांचं घर किती छान आहे. त्यावर अशोक कुमार एका सोफ्यावर जाऊन बसतात आणि म्हणतात की मला आराम करायचा असतो तेव्हा मी इथे येऊन बसतो. ही जाहिरात चांगलीच व्हायरल झाली आहे.

मीना कुमारी आणि अशोक कुमार यांचा अनोखा अंदाज

अशोक कुमार आणि मीना कुमारी हे त्या काळातले स्टार्स होते. मीना कुमारी यांना तर ट्रॅजिडी क्वीन म्हटलं जायचं. मात्र या दोघांचाही अनोखा अंदाज या खास जाहिरातीत दिसून येतो आहे. तसंच डनलप या ब्रांडची ही जाहिरात चर्चेत आली आहे. ही जाहिरात १९५३ मध्ये शूट झाली होती. ही जाहिरात आता ७२ वर्षांनी व्हायरल झाली आहे.

इंग्रजी जाहिरातीत केलं एकत्र काम

हिंदी कलाकारांनी केलेली ही इंग्रजी जाहिरात आहे. त्या काळात अशा प्रकारच्या जाहिराती कमी प्रमाणात तयार केल्या जात असत. त्या काळात असं म्हटलं जात असेल की ज्यांच्या घरं महाग आहेत त्यांच्या घरीच डनलपच्या गाद्या आणि उशा असत. डनलपची गादी वापरणारे म्हणजे श्रीमंत असं म्हटलं जात असे. अशाच एका खास वर्गासाठीची ही जाहिरात होती. डनलपच्या या जाहिरातीत अशोक कुमार यांचा स्टायलिश अंदाज दिसून येतो आहे. त्यावेळी कलाकार ब्रांड एंडॉर्समेंटमधून पैसे कमवण्यावर विश्वास ठेवत असत. पण चित्रपट जास्त प्रमाणात करत असत. आत्ताचे कलाकार सिनेमा पेक्षा जाहिरातींमधून अधिक कमाई करताना दिसतात. मात्र ही जाहिरात ७२ वर्षांपूर्वीची असून या जाहिरातीची चर्चा होताना दिसते आहे.