बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान बिग बॉस कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. सलमानच्या सूत्रसंचालनामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतो. सलमानच्या चित्रपटांची जसे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. सध्या त्याचे दोन चित्रपट चर्चेत. सलमान इतर कलाकरांनादेखील चित्रपटातून संधी देत असतो. सध्या स्टार किड्सच्या बॉलिवूड पदार्पणावरून टीका होत आहे. सलमान खान आता लवकरच त्याच्या भाचीला चित्रपटसृष्टीत दाखल करणार आहे.
सुशांत सिंह प्रकरणावरून बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका अनेकांनी टीका केली. स्टार किड्सना सतत ट्रोल केलं जात असत. आत त्यातच सलमान खानची भाची पदार्पण करणार आहे. सलमानची भाची अलिझेह अग्निहोत्रीने चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे. मात्र अलिझेह आपले पदार्पण व्यावसायिक चित्रपटातून करत नसून एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून होत आहे. अनेक पुरस्कार विजेते सौमित्र पाधी यांच्या चित्रपटात ती काम करत आहे. अलिझेह ही सलमान खानची बहीण अल्विरा अग्निहोत्रीची मुलगी आहे.
‘भोला’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अजय देवगण सलमान खान झळकणार? निर्माते म्हणाले “ते दोघे…”
अलिझेहच्या पदार्पणाबाबत तिचे वडील आणि अभिनेते अतुल अग्निहोत्री २०१९ साली एका मुलाखतीत म्हणाले होते, “याबद्दल आता बोलणे खूप घाईचे आहे. एक वडील म्हणून माझी एकच इच्छा आहे की तिने आधी स्वतः तयारी करावी, तिने स्वतःमधले सर्वोत्तम द्यावे आणि चित्रपट करताना मजा करावी. माझ्या मुलांनी हे पहिले आहे की त्यांचे कुटुंब हे चित्रपट व्यवसायात आहे त्यामुळे यातील चढ उतार त्यांनी पहिले आहेत. त्यामुळे ते नक्कीच हे लक्षात ठेवतील.”
अलिझेह अग्निहोत्री ही २२ वर्षाची असून ती अनेकदा सलमान खानबरोबर दिसली आहे. ती सलमान खानच्या ‘दबंग ३’ चित्रपटात झळकणार होती मात्र तिच्या वडिलांनी याबाबत नकार दिला होता. अलिझेह अग्निहोत्रीला मोठा भाऊ आहे अयान अग्निहोत्री असे त्याचे नाव आहे. तिने सरोज खानकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.