वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारा अभिनेता प्रतीक बब्बर सध्या चर्चेत आहे. इंडिया लॉकडाऊन’ हा त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रतीक चित्रपटाच्याबरोबरीने त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत राहिला आहे. त्याची प्रेमप्रकरण विशेष गाजली. अभिनेत्री एमी जॅक्सनबरोबर झालेल्या ब्रेकअपनंतर तो एकटा पडला होता.
या दोघांनी २०११ मध्ये ‘एक दीवाना था’ या चित्रपटात काम केले होते.या हा चित्रपट फारसा चालला नाही मात्र चित्रपटानंतर दोघे एकमेकांना डेट करत होते. याआधी एका मुलाखतीत प्रतीकने सांगितले होते की, ब्रेकअपमुळे कशापद्धतीने त्रास झाला होता. एमीबद्दल मुलाखतीत तो भरभरून बोलला होता, एमीने त्याच्यातील सर्वोत्तम गोष्टी त्याला दाखवून दिल्या होत्या. ती मनाने कशी साधी आहे याबद्दल प्रतीकने सांगितले होते. तो म्हणाला होता, “मला वाटते की माझ्या आयुष्यातील हा सर्वात वाईट टप्पा आहे. वयाच्या २५ वर्षी तुमचं ब्रेकअप होत, तेव्हा ते वेगळ्या पद्धतीने लागतं. मग मी पूर्णपणे गायब झालो होतो.” ब्रेकअपनंतर ते कधीच बोलले नाहीत.
ब्रेकअपनंतर प्रतीकने २३ जानेवारी २०१९ रोजी सान्या सागर या या अभिनेत्रीबरोबर लग्न केले. त्यापूर्वी अनेक दिवस ते एकेमेकांना डेट करत होते. परंतु लग्नाच्या एक वर्षानंतरच त्यांच्यात वाद होऊ लागल्याचं समोर आलं होतं. लॉकडाऊनदरम्यान या दोघांनी घटस्फोट घेत आपला मार्ग वेगळा करण्याचा निर्णय घेतला. सध्या तो प्रिया बॅनर्जीला डेट करत आहे. प्रतीक बब्बर आणि प्रिया यांच्यात जवळीकता वाढत असल्याच्या बातम्या आहेत.