बॉलिवूड चित्रपटांचे धमाल किस्से आपण ऐकतच असतो. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक किस्से घडत असतात. अनेकवेळा मारहाणीचे प्रसंग चित्रित करताना ते जीवावरदेखील बेतू शकतात. कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती. ती दुखापत इतकी गंभीर होती की ते अनेकदिवस रुग्णालयात उपचार घेत होते. असाच एक जीवघेणा प्रसंग एका बॉलिवूडच्या दिग्दर्शकाच्याबरोबर घडला होता.

माध्यमांच्या एका अहवालानुसार १९८१ साली दिग्दर्शक ओपी रल्हन यांच्या ‘प्यास’ चित्रपटाचे चित्रीकरकरण सुरु होते. फिल्मसिटी स्टुडिओमध्ये चित्रपटाचा सेट लावला होता. चित्रपटातील कलाकार सीनसाठी तयारी करत होते. त्या सीनमध्ये सापदेखील दाखवण्यात येणार होता. त्यासाठी एका गारुडी साप घेऊन आला होता.

chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
Mumbai 10 lakh looted marathi news
मुंबई : शस्त्रांचा धाक दाखवून १० लाख रुपये लूटले
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Geo Studios Stree 2 movie Oscar Entertainment news
जिओ स्टुडिओजला नवी झळाळी…नव्या वर्षात रंजक चित्रपटांसह सज्ज

Govinda Naam Mera Trailer: कॉमेडी सस्पेन्सने भरलेला ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; विकी कौशलचा धमाकेदार अंदाज

दिग्दर्शक ओपी रल्हन यांना सापला स्पर्श करायचा होता म्हणून ते गारुडीकडे गेले सापाला हात लावायला जाणार इतक्यात सापाने त्यांचा अंगठा पकडला आणि अंगठ्याला चावला. घाबरलेल्या ओपी रल्हन यांनी सापाची मान मुरगळी आणि सापाला फेकून दिले. या प्रसंगाने चित्रपटाच्या सेटवर पळापळ झाली. दिग्दर्शक ओपी यांना तातडीने रुग्णालयात नेले होते. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. त्यादिवशी चित्रीकरण रद्द करण्यात आले होते.

दुसऱ्या दिवशी दिग्दर्शक ओपी चित्रीकरणाच्या सेटवर पोहचले, तेव्हा तो गारुडी हताश झाला होता. त्यांनी गारुड्याची चौकशी केली तेव्हा गारुड्याने उत्तर दिले की तुम्ही त्याची मान इतक्या जोरात त्याची मान मुरगळून त्याला फेकून दिलीत की त्याचा मृत्यू झाला आहे. त्याकाळातील अनेक चित्रपट रसिकांना हा किस ठाऊक आहे. आजही चित्रपटाच्या सेटवर प्राण्यांचे चित्रीकरण करायचे असल्यास त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

Story img Loader