बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज करण्यात आला. यावर आता आलियाचे वडील आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “असित मोदींनी जाहीर माफी मागावी” ‘तारक मेहता’ फेम जेनिफर मिस्त्रीने केली मागणी; म्हणाली, “त्यांनी माझ्यावर…”

निर्माते महेश भट्ट यांनी नुकत्याच ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाच्या हॉलीवूड पदार्पणाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, “जेव्हा मी आलियाला गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांसारख्या दिग्गज आंतरराष्ट्रीय अभिनेत्यांच्या जोडीने उभे असलेले पाहिले तेव्हा मला माझ्या लेकीचा प्रचंड अभिमान वाटला. आजची तरुण मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत.”

हेही वाचा : “मूठभर पाण्यात जीव द्या” ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मण ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर भडकले; म्हणाले, “संवाद ऐकून…”

महेश भट्ट पुढे म्हणाले, “मला आठवते मी एकदा आलियाला विचारले होते की, हॉलीवूडमध्ये असे काय आहे? जे बॉलिवूडमध्ये नाही? यावर तिने मला थेट उत्तर दिले होते ‘पैसा’ तिने मला सांगितले की, त्यांच्याकडे काम करण्याची एक पद्धत आहे आणि हॉलीवूडमध्ये सगळेच अगदी प्रोफेशनल असतात, पण त्यांच्याकडे पैसा आहे. बॉलीवूडमध्ये आणखी आत्मविश्वास निर्माण होण्याची गरज आहे.”

हेही वाचा : “बॉयफ्रेंडमधील कोणता गुण सर्वात जास्त आवडतो?” तमन्ना भाटियाने एका शब्दात दिले उत्तर; म्हणाली…

आलिया हॉलीवूडमध्ये ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटाद्वारे पदार्पण करणार आहे. नुकताच याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये आलिया भट्ट गॅल गॅडोटसह अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात आलिया एका गुप्त एजंटची भूमिका निभावत आहे, इतकेच नव्हे तर ट्रेलरवरुन आलिया यामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : “कुंदनला रोखलंत, पण शंकरला कसं थांबवाल?” ‘रांझना’च्या सिक्वेलची घोषणा, धनुषच्या लुकने वेधलं लक्ष

दरम्यान, आलिया भट्टचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये आलियाबरोबर रणवीर सिंहबरोबर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आलिया-रणवीरशिवाय चित्रपटात जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood producer mahesh bhatt is proud of alia bhatt on her hollywood debut sva 00