बॉलीवूडचा प्रसिद्ध रॅपर, गायक बादशाह नेहमीच चर्चेत असतो. त्याचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ कायम चर्चेचा विषय असतात. काही दिवसांपूर्वी बादशाहचं नाव अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्याबरोबर जोडलं गेलं होतं. एका पार्टीमधील बादशाह आणि मृणालचा हातात हात पकडून जातानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण त्यावर बादशाहने स्वतः भाष्य करून या चर्चांणा पूर्णविराम दिला. आता बादशाहचं नाव पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरबरोबर जोडलं जात आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने बादशाहबरोबर काही फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले होते. “मुलं शॉपिंगला गेली,” असं कॅप्शन या पोस्टला तिने दिलं होतं. या फोटो आणि व्हिडीओमध्ये दोघं कॉफी एन्जॉय करत मस्ती करताना पाहायला मिळाले होते. हिच पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बादशाह आणि हानिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
हेही वाचा – “सनातन हिंदू धर्म संपवण्याचे भाष्य करणार्या…”, तीन राज्यातील भाजपाच्या विजयानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट
अशातच हानियाने काल आणखी काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. ज्यामध्ये बादशाह आणि ती पार्टी करताना दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने कॉफीचा इमोजी कॅप्शनमध्ये टाकला आहे. या पोस्टमुळे अजूनच बादशाह आणि हानियाच्या अफेअरच्या चर्चांणा उधाण आलं आहे.
हेही वाचा – जुई गडकरी-अमित भानुशालीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला टक्कर द्यायला येणार आता…
हानिया आमिर कोण आहे?
हानिया आमिर ही पाकिस्तानी अभिनेत्री असून ती उर्दू मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करते. तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘जनान’ या कॉमेडी चित्रपटापासून केली होती. ‘मेरे हमसफर’ या सीरिजमुळे हानिया अधिक लोकप्रिय झाली. या सीरिजमध्ये तिने साकारलेली निरागस मुलीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या सीरिजमुळे तिला जगभरातील लोक ओळखू लागले. भारतातही तिचे चाहते आहेत.