भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज स्मृती मानधना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. स्मृतीचे नाव बॉलीवूड संगीतकार आणि गायक पलाश मुच्छलबरोबर जोडले जात आहे. दोघांनाही त्यांच्या चाहत्यांनी अनेकदा एकत्र पाहिले आहे. रिलेशनशिपच्या चर्चांदरम्यान दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र, सध्या सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओमुळे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “नाटकामध्ये उमेश नसता तर…”, प्रिया बापटने सांगितला नवऱ्यासह रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव; म्हणाली, “तो नेहमीच…”

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ संगीतकार पलाश मुच्छलच्या लाइव्ह कॉन्सर्टचा आहे. या व्हिडीओमध्ये पलाशने स्टेजवरून स्मृतीविषयी प्रेम व्यक्त केले आहे. ‘स्मृतीपलाश’ नावाच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : पाचव्या दिवशीही ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची यशस्वी घोडदौड सुरूच; लवकरच पार करणार कमाईचा ‘हा’ टप्पा

पलाश हा लोकप्रिय गायिका पलक मुच्छल हिचा भाऊ आहे. या व्हिडीओमध्ये पलक सुद्धा पलाशसह उभी असल्याचे दिसत आहे. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान पलाश म्हणतो, “मी आता एक खास गाणे… माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी गाणार आहे. माझी गर्लफ्रेंड माझ्यासाठी आणि माझा परफॉर्मन्स पाहण्यासाठी मुंबईहून आली आहे. स्मृती, आय लव्ह यू टू!” अशाप्रकारे हजारो लोकांसमोर रंगमंचावरून पलाशने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. सध्या या व्हायरल व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत “तुमच्या नात्याची अधिकृत घोषणा करा” अशी मागणी स्मृती-पलाशकडे केली आहे.

हेही वाचा : किंग खानच्या सर्वात मोठ्या चाहत्याचे निधन; शाहरुखच्या प्रेमाखातर केलेली ‘ही’ गोष्ट

दरम्यान, स्मृती आणि पलाश गेली अनेक वर्ष एकत्र असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी स्मृती जुलैमध्ये बांगलादेश दौऱ्यावर गेली असताना तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पलाशदेखील बांगलादेशात गेल्याचे समोर आले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood singer palash muchhal expressed his love in live concert with cricketer smriti mandhana sva 00