सध्या देशभरात लोकसभा निवडणूक २०२४च्या निकालावर चर्चा होतं आहे. ४ जूनला अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून हा निकाल अनपेक्षित भाजपाला धक्का देणारा ठरला. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला यंदा २४० जागांवरच समाधान मानावं लागलं. ज्या राज्यातून अधिक अपेक्षा होती त्याच उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघात भाजपाला विजयासाठी खूप संघर्ष करावा लागला.

उत्तर प्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघातील निकालावरून सध्या भाजपावर टोलेबाजी सुरू आहे. कारण अयोध्या शहर हे फैजाबाद मतदारसंघात मोडते. याच निकालावरून सोनू निगम नावाच्या एका व्यक्तीची पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. या पोस्टमधून अयोध्यावासियांना टोला लगावला होता. पण नाव पाहून अनेकांना वाटलं की ही पोस्ट बॉलीवूड गायक सोनू निगमची आहे, पण तसं नाही. बिहारमध्ये राहणाऱ्या सोनू निगम नावाच्या वकिलाची ही पोस्ट होती. पण नावाच्या घोळामुळे गायक सोनू निगमला ट्रोल करण्यात आलं. याच पोस्टवरून बॉलीवूड गायक भडकला.

Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
man dies in kerala hospital after treated by fake doctor
धक्कादायक! १२ वर्षांपासून एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण करू न शकणाऱ्या बोगस डॉक्टरकडून रुग्णावर उपचार; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
Woman In Bengaluru Killed Body Chopped
श्रद्धा वालकर हत्याकाडांची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे २० तुकडे, कुठे घडली घटना?
girish kuber sitaram Yechury marathi news
अन्यथा: एकेक फोन गळावया…
pune employee stress death
पुण्यातील तरुणीचा मृत्यू कामाच्या ताणामुळे? जास्त कामाचा तिच्या प्रकृतीवर कसा परिणाम झाला? किती टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना कामाचा ताण?
Names For Baby Girls inspired by Goddess Gauri
Baby Girl Names : गौरीच्या नावावरून ठेवा तुमच्या मुलींचे नाव, पहा एकापेक्षा एक सुंदर नावांची लिस्ट

‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधताना गायक सोनू निगम म्हणाला, “जे ट्विट व्हायरल होतं आहे, ते वेगळ्याचं व्यक्तीचं आहे. वृत्तवाहिन्यांसहित ज्या लोकांनी समजलं तो मी आहे, त्यांना अकाउंटवरील माहिती वाचणं अजिबात गरजचं वाटलं नाही. त्या अकाउंटवर सोनू निगम सिंह लिहिलं होतं. तसंच खाली माहितीत लिहिलं होतं, ते बिहारमधील एक वकील आहेत.”

हेही वाचा – Video: वर्कआऊट करताना धपकन पडली प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, व्हिडीओ होतोय व्हायरल

पुढे गायक म्हणाला, “सात वर्षांपूर्वी ट्विटर (एक्स) सोडण्यासाठी ज्या घटनेनं मला भाग पाडलं त्याप्रमाणेच ही घटना आहे. मी खळबळजनक राजकीय भाष्य करण्यावर विश्वास करत नाही. मी फक्त आपल्या कामावर विश्वात करतो. पण ही घटना माझ्यासाठी नव्हेच तर माझ्या कुटुंबासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे.”

“ही व्यक्ती बऱ्याच काळापासून अशा पोस्ट करत आहे. माझ्या हितचिंतकांना त्या व्यक्तीच्या पोस्टचे स्क्रीनशॉर्ट्स येत असतात. माझी टीम त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली असून अकाउंटचं नाव बदलण्याची विनंती केली आहे. कारण माझ्या आडनावाचा वापर करून लाखो लोकांची दिशाभूल केली जात आहे. मला खात्री आहे, आम्ही यासाठी कोणताना कोणता योग्य मार्ग शोधून काढू,” असं सोनूने सांगितलं.

हेही वाचा – Video: शिवानी सुर्वे व समीर परांजपेच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नव्या मालिकेचा आणखी एक दमदार प्रोमो प्रदर्शित, पाहा…

त्या पोस्टमध्ये काय लिहिलं होतं?

सोनू निगम नावाच्या या व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिलं होतं, “ज्या सरकारने संपूर्ण अयोध्येचा कायापालट केला, नवीन विमानतळ दिलं, रेल्वे स्थानक दिलं, ५०० वर्षांनंतर राम मंदिर उभारून दिलं, एका मंदिराच्या जोरावर अर्थव्यवस्था उभारून दिली, त्या पक्षाला अयोध्या मतदारसंघात संघर्ष करावा लागत आहे. अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब आहे.”