बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम व त्याच्या काही सहकाऱ्यांना लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान धक्काबुक्की झाली आहे. सोमवारी (२० फेब्रुवारी) चेंबूरमध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान हा प्रकार घडला. या घटनेनंतर सोनू निगम व त्याच्या सहकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता प्रकृती ठीक असल्याची माहिती गायकाने दिली आहे.
सुमधूर आवाजाने चाहत्यांना वेड लावणाऱ्या सोनू निगमने पाकिस्तानमधील एका लाइव्ह कॉन्सर्टचा थरारक अनुभव शेअर केला होता. २००४ मध्ये सोनू निगम पाकिस्तानमध्ये एका कॉन्सर्टसाठी कुटुंबियासह गेला होता. कराचीमधील लष्करी भागात त्याचं कॉन्सर्ट होणार होतं. ज्या ठिकाणी कॉन्सर्ट होणार होतं त्या जागी कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी बॉम्ब हल्ला झाला होता. या घटनेची माहिती मिळताच सोनू निगमने पाकिस्तानमधून भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, दुसऱ्या दिवशी त्याने कॉनर्स्टमध्ये गाणं गाण्याचं ठरवलं. हॉटेलमधून कार्यक्रमाच्या जागी पोहोचण्यासाठी सोनू निगमला बसने प्रवास करायचा होता.
हेही वाचा>> सोनू निगम कॉन्सर्टमधून कमावतो लाखो रुपये, फक्त एका गाण्यासाठी घेतो ‘इतके’ मानधन
हेही वाचा>> VIDEO: “बच गया, नही तो मर जाता”, धक्काबुक्कीच्यावेळी काय घडलं? स्वतः सोनू निगमनेच सांगितलं, म्हणाला…
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये त्याला चार तास गाणं गायचं होतं. या कॉन्सर्टमध्ये जवळपास ८ ते १० हजार प्रेक्षक हजेरी लावणार होतं. ज्या बसमधून सोनू निगम व त्याचे कुटुंबीय कॉन्सर्टच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करत होते, त्या बसमध्येही बॉम्ब होता. रात्री १०.१५ मिनिटांनी बसच्या पुढे असणाऱ्या कारमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता. त्यामुळे सोनू निगम पूर्णत: घाबरुन गेला होता. कुटुंबीय व बसमधील इतर लोकांसाठी तो हनुमान चालीसा वाचत होता. सुदैवाने सोनू निगमच्या बसमधील बॉम्ब ब्लास्ट झाला नाही. एका मुलाखतीमध्ये सोनू निगमने या थरकाप उडवणाऱ्या घटनेबद्दल सांगतिलं होतं.
हेही वाचा>> सोनू निगमला झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी चेंबुरच्या आमदाराचं स्पष्टीकरण; म्हणाले “जे घडलं…”
“देवाने मला व माझ्या कुटुंबियांना एक नवा जन्म दिला आहे”, असं सोनू निगम म्हणाला होता. सोनू निगम त्याच्या प्रत्येक शोच्या आधी हनुमान चालीसाचं पठण करतो. यामुळे आत्मविश्वास अधिक दृढ होत असल्याचं त्याने सांगितलं होतं.