भारतीय संगीत विश्वातील दिग्गज गायक उदित नारायण खूप चर्चेत आहेत. उदित नारायण यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते लाइव्ह कॉन्सर्टमध्ये काही महिलांच्या गालावर, तर काही जणींच्या ओठांवर चुंबन घेताना दिसत आहे. त्यामुळे उदित नारायण यांच्यावर सध्या टीकास्त्र होतं आहे. अशातच दुसऱ्या बाजूला उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत “मला कसलाही पश्चाताप झाला नाही”, असं वक्तव्य उदित नारायण यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख खान, आमिर खान, गोविंदा आणि हृतिक रोशनसह अनेक सुपरस्टार्सच्या चित्रपटातील गाणी गाणारे उदित नारायण नुकताच ‘बॉलीवूड हंगामा’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी उदित नारायण म्हणाले, “माझे चाहत्यांशी पवित्र आणि अतूट नातं आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ एक षडयंत्र आहे. माझा आणि चाहत्यांमधील हा एक प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे. मी चाहत्यांवर खूप प्रेम करतो आणि चाहते माझ्या खूप प्रेम करतात.”

पुढे उदित नारायण स्वतःला भारतरत्न मिळण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाले, “मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण अशा अनेक पुरस्कारांनी मला गौरविण्यात आलं आहे. मी आता लता मंगेशकर यांच्या प्रमाणे भारतरत्न मिळण्याची इच्छा व्यक्त करतो. लता मंगेशकर माझ्या प्रेरणा आहेत.” त्यानंतर उदित नारायण यांनी लता मंगेशकर यांच्या आवडत्या सह गायकांपैकी स्वतः एक असल्याचं सांगितलं. तसंच आयुष्यात जे काही मिळालं आहे, सरस्वती देवीमुळे मिळाल्याचं, गायक म्हणाले.

तसंच, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून पश्चाताप झालेला नाही असं थेट उदित नारायण यांनी सांगितलं. ते म्हणाले, “नाही, अजिबातच नाही. मला पश्चाताप का होईल? माझ्या आवाजात कोणत्याही प्रकारची खंत किंवा दुःख जाणवतं का? मी आता तुमच्याशी बोलताना हसत आहे. ही काही गुप्त किंवा वाईट गोष्ट नाहीये. हे पूर्णपणे पब्लिक डोमेनमध्ये आहे. माझं मन शुद्ध आहे. जर काही लोकांना खुल्या मनाने केलेल्या प्रेमात वाईट बघायचं असेल तर मला त्याची खंत वाटते.”