सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनपासून ते शाहरुख खानपर्यंत अनेक सेलिब्रिटी ‘ओम शांती ओम’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. पण हा कार्यक्रम नक्की काय आहे? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूड सेलिब्रिटींचा हा व्हायरल व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, शाहरुख खान, सुहाना खान, करीना कपूर, करण जोहर असे अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. हे सेलिब्रिटी ‘ओम शांती ओम’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. पण इतके सारे सेलिब्रिटी एकाच वेळी का हजर आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

हेही वाचा – Photos: मुक्ता-सागरच्या संगीतला ‘स्टार प्रवाह’ परिवारातील खास पाहुण्यांची हजेरी; करणार ‘या’ गाण्यांवर डान्स

तर हे बॉलीवूड सेलिब्रिटी कुठल्याही पुरस्कार सोहळा नाहीतर मुलांच्या कार्यक्रमाला हजर राहिले होते. काल (१५ डिसेंबरला) धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. या शाळेत शाहरुख, ऐश्वर्या, करीना, करण, शाहिद कपूर अशा सेलिब्रिटींची मुलं शिकायला आहेत. त्यामुळे त्यांच्या वार्षिक स्नेहसंमलेनाच्या निमित्ताने हे सेलिब्रिटी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी हजर राहिले होते. यावेळी या सेलिब्रिटींच्या मुलांनी आपली कला सादर केली. कोणी डान्स केला, तर कोणी अभिनय केला. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: पहिल्यांदाच वेगळ्या हेअरस्टाइलमध्ये दिसली आराध्या बच्चन; नेटकरी म्हणाले, “अखेर १२ वर्षांनंतर कपाळ…”

दरम्यान, या कार्यक्रमात शाहरुख खानचा लहान मुलगा अबरामने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने त्याच्या नाटकामध्ये किंग खानच्या चित्रपटातील सीन्स रिक्रिएट केला. शिवाय शाहरुखची आयकॉनिक पोज देखील केली. तसेच ऐश्वर्याची मुलगी आराध्या पहिल्यांदा नव्या रुपात आणि नव्या हेअरस्टाइलमध्ये पाहायला मिळाली. तसेच करीना व करण जोहरची मुलं डान्स करताना दिसली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood stars amitabh bachchan aishwarya abhishek shah rukh khan and karan johar dance at kids annual day event pps