वडील सिनेइंडस्ट्रीत सुपरस्टार असले तरीही त्यांच्या मुलांना तेवढंच यश मिळेल, असं नाही. ७० व ८० चे दशक आपल्या अभिनयाने गाजवणारे जितेंद्र यांनी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले; मात्र, त्यांच्या इतकी लोकप्रियता त्यांचा मुलगा तुषार कपूरला मिळाली नाही. डेली सोप क्वीन एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर २३ वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये जवळपास १९ फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र व शोभा कपूर यांचा मुलगा तुषारने करिअरची सुरुवात सुपरहिट सिनेमा देऊन केली होती. पुढे त्याने अनेक चित्रपट केले, मात्र त्यापैकी बरेच फ्लॉप ठरले.

हेही वाचा – “खूप झालंय आता, मला…”; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन असं का म्हणाला?

तुषार कपूरचे फिल्मी करिअर

तुषार कपूरला फिल्म इंडस्ट्रीत २३ वर्षे झाली आहेत. त्याने २००१ मध्ये ‘मुझे कुछ कहना है’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यात त्याच्याबरोबर करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. तुषार व करीनाचा हा चित्रपट सुपरहिट झाला होता. तुषारने हिट चित्रपटातून करिअरची सुरुवात केली मात्र त्याचा त्याला फार फायदा झाला नाही.

हेही वाचा – ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”

पहिला चित्रपट यशस्वी झाल्यावर त्याला अनेक चित्रपट मिळाले, त्यापैकी काही हिट झाले तर काही फ्लॉप झाले. ‘क्या दिल ने कहा’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘कुछ तो है’, ‘ये दिल’ हे चित्रपट फ्लॉप राहिले. तर, ‘खाकी’ व ‘गायब’ या चित्रपटांनी सरासरी कामगिरी केली होती.

तुषार कपूरचे फ्लॉप चित्रपट

तुषार कपूरने करिअरमध्ये हिट चित्रपट दिले आहेत; मात्र त्याच्या नावावर अनेक फ्लॉप चित्रपटही आहेत. त्याचे ‘क्या कूल हैं हम’, ‘गोलमाल’ हे चित्रपट हिट झाले होते. मात्र, ‘क्या लव स्टोरी है’, ‘गुड बॉय बॅड बॉय’, ‘ढोल’, ‘हम तुम शबाना’, ‘चार दिन की चांदनी’, ‘बजाते रहो’, ‘क्या कूल हैं हम ३’, ‘सी कंपनी’, ‘लाइफ पार्टनर’, ‘शोर इन द सिटी’, ‘लव्ह यू मि. कलाकार,’ ‘मस्तीजादे’,’संडे’, ‘वन टू थ्री’ हे चित्रपट फ्लॉप झाले. तुषारच्या २३ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास १९ चित्रपट फ्लॉप राहिले.

हेही वाचा – दिलीप जोशी-असित मोदी यांच्या भांडणाच्या वृत्तावर ‘आत्माराम भिडे’ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आम्ही सर्वजण…”

तुषार कपूर रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजचा महत्त्वाचा भाग राहिला. या चित्रपटांमधील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. गोलमाल सीरिजचे सर्व चित्रपट हिट ठरले.

तुषार कपूरचे आगामी चित्रपट कोणते?

तुषार कपूरने ‘लव्ह सेक्स और धोखा २’ मध्ये कॅमिओ केला होता. आता त्याच्याकडे दोन चित्रपट आहेत. तो ‘वेलकम टू जंगल’ मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर ‘कपकपी’ नावाच्या एका चित्रपटातही तो काम करतोय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood superstar jitendra son tusshar kapoor filmy career flop movies hrc