बॉलीवूडचा बादशाह किंग खानचा आज ५८ वा वाढदिवस आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर चाहत्यांनी मध्यरात्री गर्दी केली. शाहरुखनेही मध्यरात्री बाहेर येत चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. शाहरुखच्या बंगल्याबाहेरचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.

यशस्वी उद्योजक आणि शाहरुख खानची पत्नी- गौरी शाहरुख खानचा प्रवास तुम्हाला माहितेय का?

Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Jitendra Awhad
Jitendra Awhad : “ताजमधले केक अन् चांगली कॉफी…” विधानसभेच्या अध्यक्षांचे अभिनंदन करताना आव्हाडांची खास मागणी चर्चेत

शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’बाहेर तुफान गर्दी केली होती. हातात पोस्टर घेऊन चाहते बाहेर उभे होती. गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही करण्यात आला होता. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये अगदी लहान मुलं, तरुण, महिला व पुरुषांचाही समावेश होता.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर जमलेल्या चाहत्यांना शाहरुखने निराश केलं नाही. त्याने बाहेर येत हात जोडून सर्वांचे आभार मानले चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. ‘मन्नत’बाहेरचे फोटो व व्हिडीओ आल्यानंतर चाहते त्यावर कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, घराबाहेर चाहते जमल्यानंतर शाहरुखने सर्वांचे आभार मानले. तसेच त्याने सोशल मीडियावर पोस्टही केली. “तुमच्यापैकी बरेच जण रात्री उशिरा येतात आणि मला शुभेच्छा देतात हे अविश्वसनीय आहे. मी फक्त एक अभिनेता आहे. मी तुमचं थोडं मनोरंजन करू शकेन यापेक्षा जास्त आनंद मला दुसरी कोणतीच गोष्ट देत नाही. तुझ्या प्रेमाच्या स्वप्नात मी जगतो. मला तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद,” अशी पोस्ट त्याने मध्यरात्री केली.

आज शाहरुख खानच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरही त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. इतर सेलिब्रिटीही शाहरुखला सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.

Story img Loader