बॉलिवूडचा किंग खान अर्थात हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा वाढदिवस होऊन गेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच्या वाढदिवसाला चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सध्या तो त्याच्या आगामी पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. वाढदिवसाच्या दिवशी ‘पठाण’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याचा लुक्सची चर्चा होत आहे. आता हाच अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

पिंकव्हीलच्या माहितीनुसार ‘पठाण’चे चित्रीकरण संपल्यानंतर शाहरुख खान ‘टायगर ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणात सामील होईल. सलमान सध्या बिग बॉस १६ पर्वाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्याचा ‘किसी का भाई किसी का जान’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्या पदतीने शाहरुख खान टायगर चित्रपटात दिसणार आहे त्या पद्धतीने सलमानदेखील ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. खुद्द शाहरुख खानने याचा खुलासा केला आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
legendary filmmaker shyam benegal
अग्रलेख: भारत भाष्य विधाता!
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
abhijeet bhattacharya shah rukh khan
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
Shah Rukh Khan Emotional On Swades Act
Video : लेकाच्या शाळेत २० वर्षांपूर्वीचं ‘ते’ एव्हरग्रीन गाणं ऐकून भावुक झाला शाहरुख खान! व्हिडीओ व्हायरल

“३० दिवसात चित्रपट करणारे अभिनेते…”; बोनी कपूर यांचा अक्षय कुमारवर निशाणा

यापूर्वी शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटात सलमानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती तर शाहरुख खानने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात मधल्या काही वर्षात वादांमुळे दुरावा आला होता. काही वर्षं दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र आता त्यांच्यातील वाद संपले आहेत. ते दोघेही अनेकदा एकत्र कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतात.

शाहरुख खान पठाणच्या बरोबरीने ‘जवान’ ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे ‘डंकी’ या चित्रपटातून तो पहिल्यांदा दिग्दर्शक राजू हिरानी यांच्याबरोबर काम करताना दिसून येणार आहे.

Story img Loader