संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींच ज्याकडे लक्ष वेधलं आहे, तो क्षण अखेर सुरू झाला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील आयसीसी विश्वचषक २०२३चा अंतिम सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत फलंदाजी करून ऑस्ट्रेलिया समोर किती धावांच आव्हान देतोय? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. या महामुकाबल्यात भारताला चिअर करण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला अहमदाबादला पोहोचली आहे. त्यापूर्वी तिने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधून अंतिम सामन्यासाठी खूप उत्साहित असल्याचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना पाहण्यासाठी दीपिका पदुकोण पती रणवीर सिंह अन् वडिलांबरोबर अहमदाबादला रवाना, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री उर्वशी रौतेला ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाली की, मी खूपच उत्साहित आहे. भारतच विश्वचषक जिंकणार, याची मला खात्री आहे. मी आधीच पॅरिसमध्ये विश्वचषकाला स्पर्श केला. इतकंच नाहीतर किस पण केली. हा खूप भारी अनुभव होता. यानंतर उर्वशीला तिचा आवडता क्रिकेट कोण? असं विचारण्यात आलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली की, “संपूर्ण संघ माझा आवडता आहे.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने बहिणीच्या लग्नातले खास फोटो केले शेअर; म्हणाला, “अमृता खूप…”

आजच्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी उर्वशी व्यतिरिक्त मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, मिथीला पालकर असे अनेक सेलिब्रिटींनी भारतीय संघाला चिअर करण्यासाठी आयसीसी विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्याला हजेरी लावली आहे.

दरम्यान, आयसीसी विश्वचषक २०२३च्या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठीही उर्वशी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. पण हा सामना तिला चांगलाच महागात पडला. अभिनेत्रीचा २४ कॅरेट सोन्याचा आयफोनवर काही चोरट्यांनी डल्ला मारला. यासंदर्भात उर्वशीने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood urvashi rautela reaction on india vs australia final icc world cup 2023 pps
Show comments