शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद आणखीनच पेटला आहे. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने बराच वाद सुरू आहे. सोशल मीडियावरूनही या चित्रपटाला विरोध दर्शवण्यात येत आहे. काही राजकीय मंडळींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आता पाठोपाठ या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे तरी ‘बेशरम रंग’ची चर्चा थांबायचं काही नाव घेत नाहीये. सेलिब्रिटीजसुद्धा यावर त्यांचं मत व्यक्त करत आहेत. नुकतंच लेखक मनोज मुंतशीर यांनी या वादात उडी घेतली आहे. या गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादावर त्यांनी त्यांचं मत नोंदवलं आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

आणखी वाचा : Year Ender 2022 : सरत्या वर्षात या दिग्गज कलाकारांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी झाली पोरकी

त्यांनी कुणावरही टीका केली नाही पण एकूणच एवढा विरोध होऊनही या गाण्यात काहीच बदल करण्यात आलेले नाहीत असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. दैनिक भास्करशी संवाद साधताना मनोज मुंतशीर म्हणाले, “जर लोकांच्या भावना दुखावल्या आहेत तर निर्मात्यांकडून नक्कीच काहीतरी चूक झालेली आहे. चूक दुरुस्त करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. दिग्दर्शक, संगीतकार तसेच शाहरुख खान यांना जर चूक सापडली असती तर त्यात नक्कीच त्यांनी बदल केले असते.”

गेली काही वर्षं चाहते शाहरुखच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. या गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे हा चित्रपटसुद्धा बॉयकॉट करावा अशी मागणी होताना दिसत आहे. ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे. शाहरुखसह दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम यांची यात महत्त्वाची भूमिका आहे.